शिवसेनेकडून महागाईविरोधी आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:29 AM2020-12-12T04:29:22+5:302020-12-12T04:29:22+5:30
पेट्रोलचे दर ९० च्या तर डिझेलचे दर ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये भरमसाठ वाढ ...
पेट्रोलचे दर ९० च्या तर डिझेलचे दर ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. याविरोधात शिवसेनेच्या पुणे शहर शाखेच्यावतीने मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथे निषेध आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार नावाने बोंब मारण्यात आली. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहर संघटिका सविता मते, नगरसेवक बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख, श्याम देशपांडे, महिला आघाडी स्वाती ढमाले स्वाती कथलकर उपस्थित होते.
==
‘पुणे भाजपाची शोकांतिका’
पालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपाकडे ९८ नगरसेवक असतानाही यातील एकही नगरसेवक कार्यक्षम अथवा योग्यतेचा नसल्यामुळे पुणेकरांनी नाकारलेल्या स्विकृत नगरसेवकाला सभागृह नेतेपद द्यावे लागले. यासोबतच वडगावशेरीतील जनतेने विधानसभा निवडणूकीत ज्यांना मतदार नागरिकांनी नाकारले त्यांना शहर अध्यक्ष केले. ज्यांना सभागृहात मतदानाचा अधिकार नाही ते सभागृहाचे नेते झाले हीच भाजपाची शोकांतिका असल्याची टीका शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली.