आगामी निवडणटकीसाठी शिवसेनेने सज्ज रहावे: आढळराव-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:58+5:302021-07-24T04:07:58+5:30
मागील दहा दिवसांपासून जुन्नर तालुक्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत होते. त्याचा समारोप गुरुवारी जुन्नर शहर संपर्क कार्यालयात ...
मागील दहा दिवसांपासून जुन्नर तालुक्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत होते. त्याचा समारोप गुरुवारी जुन्नर शहर संपर्क कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रमुख शरद सोनवणे, संभाजी तांबे, शरद चौधरी, जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे, शहर प्रमूख चंद्रकांत डोके, मंगेश काकडे, अविनाश करडीले, नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, युवा सेना प्रदेश पदाधीकारी गणेश कवडे, युवा महेश शेळके विशाल परदेशी, गटनेते समीर भगत, नगरसेविका कविता गुंजाळ , अंकिता गोसावी, संघटक शाम खोत, माऊली होगे, विनायक गोसावी, विकी पारखे, सुनील चव्हाण, अकील शेख, रिझवान पटेल, जयश्री महाबरे, रुपाली शहा आदी उपस्थित होते.
सोनवणे म्हणाले, विकास कामे भरपूर झाली मात्र जुन्नर तालुक्यात व शिरूर मतदार संघात सत्ता राखता आली नाही. हे शल्य कायम असून या पुढील काळात संघटना मजबूत करण्यात येईल. माऊली खंडागळे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून जुन्नर शहरात गेल्या साडे चार वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहे. हिंदू मुस्लिम समाजाला विकास कामात समान न्याय देण्याचे काम नगराध्यक्ष शाम पांडे व इतर नगरसेवकांनी केले आहे.