चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:01+5:302021-05-19T04:10:01+5:30
चक्रीवादळात भोरगिरी, भिवेगाव या परिसरात झालेल्या नुकसानीचे शासनाच्या मार्फत तत्काळ पंचनामे करण्यात आले असून शासनाकडून नुकसानभरपाई मिळेपर्यंत पर्यंत ज्यांच्या ...
चक्रीवादळात भोरगिरी, भिवेगाव या परिसरात झालेल्या नुकसानीचे शासनाच्या मार्फत तत्काळ पंचनामे करण्यात आले असून शासनाकडून नुकसानभरपाई मिळेपर्यंत पर्यंत ज्यांच्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून किराणा साहित्यासाठी आढळराव यांनी रोख १५ हजारांची प्राथमिक मदत केली. तसेच पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर व जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे आणि मित्र परिवारातर्फे १०० सिमेंट पत्रे मदत म्हणून देण्यात आले. यावेळी स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, केशव अरगडे, संतोष सांडभोर, विजयसिंह शिंदे, मारुती सातकर, एल. बी. तनपुरे, सरपंच दत्तात्रय हिले, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावकामगार तलाठी, दत्तात्रय वनघरे, दिलीप सोनवणे, सुरेश काठे, संजय काठे, संतोष काठे, ग्रामसेवक लिखारे व ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १८ राजगुरुनगर नुकसान मदत
फोटो ओळी : चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना १०० सिमेंटी पत्रे देताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक.