पाबळच्या सरपंचपदी शिवसेनेचे मारुती शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:23+5:302021-02-26T04:16:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिक्रापूर : पाबळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मारुती ज्ञानेश्वर शेळके तर उपसरपंचपदी राजाराम वाघोले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : पाबळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मारुती ज्ञानेश्वर शेळके तर उपसरपंचपदी राजाराम वाघोले यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व राखले आहे.
दहा सदस्यांचे पाठबळ मिळाल्याने शिवसेनेचा मार्ग सुकर झाला होता. सरपंचपदासाठी मारुती शेळके व शिवसेनेचेच सचिन शिवाजी वाबळे यांचा अर्ज आला होता. सचिन वाबळे यांनी अर्ज माघारी घेतल्याने शेळके यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी राजाराम वाघोले व सपना जाधव यांनी अर्ज दाखल केला. सपना जाधव यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने वाघोले यांची बिनाविरोध निवड झाली.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य सोपान जाधव, रोहिणी जाधव, रवींद्र चौधरी, हृषीकेश कोल्हे, सपना जाधव, सचिन वाबळे, रोहिणी चव्हाण, दिलीप घाटकर, शशिकला जाधव, सिंधूबाई बगाटे, सुभद्रा बगाटे, मनीषा आगरकर, मीरा नऱ्हे, रोहिणी चव्हाण, किरण पिंगळे उपस्थित होते. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय आधिकारी म्हूणन धनंजय हिरवे व ग्रामविकास आधिकारी आशिष भागवत यांनी काम पाहिले.
फोटो पाबळ ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा विजय साजरा करताना.