मुबलक प्रमाणात लस मिळावी म्हणून शिवसेनेचे जन आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:02+5:302021-04-13T04:09:02+5:30
शासकीय विभागातील तलाठी ऑफिसात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र व पुणे शहराला रुग्णसंख्येप्रमाणे लस मिळावेत. तसेच पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरातील ...
शासकीय विभागातील तलाठी ऑफिसात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र व पुणे शहराला रुग्णसंख्येप्रमाणे लस मिळावेत. तसेच पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरातील कोरोना लसीकरण केंद्रावरती पुरेशा प्रमाणामध्ये लस उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी पाषाण तलाठी ऑफिसमध्ये जाऊन निवेदन देण्यात आले. या वेळी पुणे उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, कोथरूड विधानसभा संघटक संजय निम्हण, युवा सेना उपविभागीय अधिकारी अमित रणपिसे, उद्योजक राजेंद्र मुरकुटे उपस्थित होते.
पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये लोकसंख्येच्या व रुग्णांच्या संख्येच्या तुलनेने लसीकरण केंद्रांची कमतरता आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर देखील पुरेशी लस मिळत नाही. लोकसंख्या व रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या वेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.