खेड तालुक्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:02+5:302021-07-18T04:08:02+5:30
या वेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, स्व. सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, ...
या वेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, स्व. सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, जिल्हा महिला संघटिका विजया शिंदे, जि.प.सदस्य बाबाजी काळे, रूपाली कड, संघटक सुभाष मांडेकर, उपतालुकाप्रमुख महादेव लिंभोरे, विभागप्रमुख गणेश मांडेकर, उपविभागप्रमुख अमोल पाचपुते, किसन नवले, सचिन पडवळ, बाबाजी कावरे, विक्रम पाचपुते, विजय घनवट, सचिन पाचपुते, बबन पाचपुते, सागर पाचपुते, सुरेश शेळके, नितीन रायकर, मोहन लांडगे, विशाल घाटे आदी उपस्थित होते.
अशोक खांडेभराड म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शिवसेनेच्या कल्याणकारी योजना आणि ध्येयधोरणे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेने गेल्या पाच दशकांतील वाटचालीत मराठी माणसाची अस्मिता जपत आपले राजकीय अस्तित्व वेळोवेळी दाखवून दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा शिवसेना आजही जपत आहे. सर्वसामान्य माणसाचे हित जोपासणे हाच खरा विकासाचा मंत्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवभोजन थाळीसारखे कौतुकास्पद उपक्रम लॉकडॉऊनच्या काळात राबवले आहेत. हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
१७ चाकण
खेड तालुका शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानच्या वेळी उपस्थित मान्यवर.