ॲपवर नोंद झाली तरच मिळते शिवभोजन थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:18+5:302021-07-27T04:11:18+5:30
(स्टार ९६९ डमी) पुणे : ॲपवर नोंदणी केली तरच नागरिकांना शिवभोजन थाळी मिळण्याची व्यवस्था आहे. प्रत्येकाला शिवभोजन थाळी ...
(स्टार ९६९ डमी)
पुणे : ॲपवर नोंदणी केली तरच नागरिकांना शिवभोजन थाळी मिळण्याची व्यवस्था आहे. प्रत्येकाला शिवभोजन थाळी देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याबाबत प्रत्येक थाळी केंद्राला सूचना दिल्या आहेत. त्याबाबत नियमित तपासणी करावी. पुणे शहर, पिंपरी आणि ग्रामीण भागात मिळून दररोज १३ हजार ८८६ नागरिकांना शिवभोजन थाळी देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शिवभोजन थाळीसाठी रांगेत उभे राहूनही कोटा संपल्याने उपाशीपोटी परतणाऱ्यांची संख्या जवळपास नाहीच. दररोज नागरिकांना थाळी देण्याची व्यवस्था केली जाते. त्यासाठी पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्राची भेट देऊन तपासणी केली जाते. कोणत्याही केंद्रावरून एकही नागरिक परत जाता कामा नये. यासाठी काटेकाेर पालन करण्यात येत आहे. मोबाईल ॲपचा काही समस्या उद्भवली तरच क्वचितप्रसंगी अडचण निर्माण होते. परंतु, त्या नागरिकाला शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाते. एकाही नागरिकाला रिकामा हाताने परत पाठवले जात नाही.
-----
पाँईंटर्स
* पुणे जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्र - ७८
* पुणे जिल्ह्यातील रोज लाभार्थ्यांची संख्या - ८७२१
* पुणे आणि पिंपरी शहरातील केंद्र - ३५
* पुणे आणि पिंपरी शहरातील रोज लाभार्थ्यांची संख्या - ५१६५
-----
* एकही उपाशीपोटी राहत नाही
१) दररोज २६३ जणांना देतो थाळी
आमच्याकडे दररोज २६३ जणांना शिवभोजन थाळी दिली जाते. तेवढे लोक सरासरी आमच्याकडे येतात. केव्हातरी संख्या वाढली तर आम्ही आमच्या पदरच्या १० ते १५ जास्त शिवभोजन थाळी तयार ठेवतो. त्या आम्ही शासकीय दरानेच नागरिकांना देतो. त्यामुळे आमच्या केंद्रातून एकही जण उपाशीपोटी परत जात नाही.
- मामलेदार कचेरी, शिवभोजन थाळी केंद्र, शुक्रवार पेठ
-----
क्वचितप्रसंगी एकादी थाळी कमी पडते
आमच्याकडे दररोज २८०-२९० जणांना शिवभोजन थाळी दिली जाते. आम्हाला शासनाकडून तेवढ्याच मंजूर आहेत. महिन्याभरात एखाद्यावेळेस एक-दोन शिवभोजन थाळी कमी पडते. त्यामुळे त्यादिवशी एक-दोन जणांना परत जावे लागते. परंतु, ही परिस्थिती नेहमी नसते. कधीतरी अशी परिस्थिती येते.
- माकेर्ट यार्ड, शिवभोजन थाळी केंद्र
-----
* रोज १३ हजार ८८६ जणांचे पोट भरते
संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकूण ११३ शिवभोजन थाली केंद्र आहेत. त्यात पुणे शहरात २३ केंद्र, पिंपरी-चिंचवड शहरात १२ आणि ग्रमीण भागात ७८ असे एकूण ११३ केंद्र सध्या सुरू आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दररोज ५ हजार १६५, तर ग्रामीण भागात ८७२१ असे एकूण १३ हजार ८८६ नागरिकांना शिवभोजन थाळी दिली जात आहे.