बारामतीत शिवजयंती शांततेत साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:17+5:302021-04-01T04:10:17+5:30
बुधवार (दि. ३१) शहरातील मारवडपेठ, गुणवडी चौक, गांधी चौक,स्टेशन रोड, भिगवण चौक, सिनेमा रोड, इंदापूर चौका-चौकांत शिवजयंती उत्सव ...
बुधवार (दि. ३१) शहरातील मारवडपेठ, गुणवडी चौक, गांधी चौक,स्टेशन रोड, भिगवण चौक, सिनेमा रोड, इंदापूर चौका-चौकांत शिवजयंती उत्सव मंडळांनी साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी कोरोनाचे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. मारवडपेठेतील राजे ग्रुपचे दरवर्षी नवनवीन देखावे सादर होतात. मात्र यंदा साध्या पद्धतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सालाबाद प्रमाणे अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ,आणि शिवराज्य प्रतिष्ठान बारामती यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड सुधीर पाटसकर,नगरसेवक बबलू देशमुख उपस्थित होते. मोजक्या मान्यवरांच्या हस्ते सोहळा पार पडला.
तांदुळवाडी वेस चौक येथे अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने महात्मा गांधी चौक येथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्सवास सुरुवात झाली. यावेळी ५०० मस्कचे वाटप करण्यात आले शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन जाधव, निलेश गायकवाड, श्रीकांत जाधव, मोहन पंजाबी, अविनाश भापकर, सुभाष सोमाणी, किरण इंगळे, प्रकाश पळसे, अॅड.रीतेश सावंत, राहुल जाधव, राजेश जाधव, स्वप्नील भागवत, तेजस गायकवाड, सोनू बामने, सोनू जाधव, चेतन बा.जाधव, विशाल गायकवाड, प्रथमेश गायकवाड, अनिता गायकवाड, सिमा चिंचकर ज्योती इंगळे, शितल गायकवाड, ज्योती लडकत आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
बारामती येथे अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाच्या वतीने साधेपणाने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली.
३१०३२०२१-बारामती-०८