इंदापूर शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:33 AM2021-02-20T04:33:53+5:302021-02-20T04:33:53+5:30

इंदापूर : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इंदापूर शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र ...

Shiva Jayanti celebrations in various places in Indapur city | इंदापूर शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

इंदापूर शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

Next

इंदापूर : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इंदापूर शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदा उत्साह होता मात्र जयंती अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना शहिद झालेल्या कोरोना योद्धयांना आदरांजली वाहण्यात आली. अनेक कोविड योध्यांचा सन्मान करण्यात आला.

इंदापूर शहरातील इंदापूर बस स्थानक येथे एसटी महामंडळ कर्मचारी व संघटना तसेच रचना परिवार व युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवरायांचा मुस्लिम मावळा मुन्नाभाई बागवान यांचा सन्मानचिन्ह देवून प्रशांत शिताप व रचना परिवाराचे प्रमुख माजिदखान पठाण यांनी सन्मान केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी भाषण केले.

बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा ठेवण्यात आली होती व दिवसभर पोवाडे व शिवकालीन गाण्यांनी वातावरण निर्मिती झाली होती. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे, धरमचंद लोढा, रचना परिवाराचे माजिदखान पठाण व त्यांचे कर्मचारी तसेच एस टी कर्मचारी संघटना, कैलास कदम , महेश जाधव, कामधेनू परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे व शिवभक्त परिवार व युवा क्रांती प्रतिष्ठान मित्र परिवार उपस्थित होते.

सकल युवा शिवभक्त इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर महाविद्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा पाळणे गाऊन साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या कोविड योध्यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले.

त्याचबरोबर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर व लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठेनगर, लोकमान्यनगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक तथा आरोग्य सभापती अनिकेत वाघ, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक अमर गाडे, स्वप्निल राऊत, दादासाहेब सोनावणे प्रा. अशोक मखरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, सामाजिक कार्यकर्ते अनिल ढावरे, बाळासाहेब सरवदे, युवा नेते प्रशांत ऊंबरे, अहमदरजा सय्यद, शुभम पवार आदी मान्यवर व शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

अरबाज शेख मित्र परिवार यांच्या वतीने युवक नेते अरबाज शेख यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, राष्ट्रवादी शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस व सर्व नगरसेवक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

त्याच बरोबर शहरातील टेंभुर्णी नाका, अकलूज नाका, नेहरू चौक, श्रीराम सोसायटी, सोनाईनगर, अंबिकानगर, चाळीस फुटी रोड, शंभरफुटी रोड, सावतामाळीनगर, सरस्वतीनगर अशा विविध भागात मोठया उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

१९ इंदापूर शिवजयंती

इंदापूर बस स्थनाकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर

Web Title: Shiva Jayanti celebrations in various places in Indapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.