कान्हुरमेसाई येथे मुस्लिम बांधवांच्या हस्ते शिवपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:27 AM2021-02-20T04:27:51+5:302021-02-20T04:27:51+5:30

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सामान्यज्ञान स्पर्धा, पाळणा, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले होते. विजेत्यांना विद्या विकास मंडळाचे सचिव सुदाम तळोले, शिवसेना ...

Shiva Pujan at the hands of Muslim brothers at Kanhurmesai | कान्हुरमेसाई येथे मुस्लिम बांधवांच्या हस्ते शिवपूजन

कान्हुरमेसाई येथे मुस्लिम बांधवांच्या हस्ते शिवपूजन

Next

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सामान्यज्ञान स्पर्धा, पाळणा, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले होते. विजेत्यांना विद्या विकास मंडळाचे सचिव सुदाम तळोले, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी दळवी यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आली. यावेळी विद्याधाम प्रशालाचे अध्यक्ष जी. के. पुंडे, अल्ताफ तांबोळी, आंबीद तांबोळी, शबाज तांबोळी, गौरी गायकवाड, तोफिक तांबोळी, बशीर मुलानी, भरत गायकवाड, पर्यवेक्षक साहेबराव आंधळे तसेच संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी तलस्मी तांबोळी म्हणाल्या की, शिवाजी महाराजांनी कधीच जातीपातीला थारा दिला नाही. त्यांनी बळ दिले ते स्वराज्य आणि स्वराज्य निर्मितीला स्वराज्याच्या सैन्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना सन्मानाचे पद होते, त्यांच्यावर विश्वास होता, आज हे दिसत नाही ते बदलायचे असेल तर आपण शिवरायांची धर्म सहिष्णुता अभ्यासावी व अंगीकारली पाहिजे.

यावेळी प्राचार्य अनिल शिंदे, संयोजन प्रकाश चव्हाण, दीपक मोरे, विनोद शिंदे, सुनीता खर्डे, जयश्री गायकवाड, बेबीनंदा केंदळे, सोमनाथ केदारी, बाळू भांडलकर उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक: १८कान्हूरमेसाई शिवजयंती मुस्लिम समाज

फोटो ओळी : कान्हुरमेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेत शिवरायांच्या प्रतिमांच्या पूजन करताना प्रा.तस्लिम तांबोळी, प्राचार्य अनिल शिंदे

Web Title: Shiva Pujan at the hands of Muslim brothers at Kanhurmesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.