शिवारे भातकाढणीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:07 PM2018-11-14T23:07:24+5:302018-11-14T23:07:51+5:30
भीमाशंकर, पाटण, आहुपे खोरे : हळव्या जातीच्या भाताचे पीक सर्वाधिक प्रमाणात
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यांमध्ये हळव्या जातीच्या भातकाढणीसाठी भातशिवारे सज्ज झाली असून, आदिवासी शेतकºयांची लगबग सुरू आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. सध्या या खोºयांमध्ये भातशिवारे भातरोपे काढण्यासाठी सज्ज झाली आहेत. गतवर्षापेक्षा यंदा वरुणराजाने लवकरच काढता पाय घेतल्याने हळव्या जातीच्या भातकाढणीसाठी वेग आला आहे.
आदिवासीबांधव हा प्रत्येक वर्षी रोहिणी व मृग नक्षत्राच्या काझ्यांमध्ये हा शुभमुहूर्त समजून धूळवाफेत पेरण्या करीत असतो. आदिवासीबांधवांनी या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काझ्यांमध्ये काही ठिकाणी धूळवाफेत, तर काही ठिकाणी चीडवाफेत पेरण्या उरकून घेतल्या. गतवर्षापेक्षा चालूवर्षी रोहिणी, मृग नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसू (कोर) या नक्षत्रांतही सुरुवातीपासूनच पावसाने चांगली साथ दिल्याने भातपेरणी केलेला वरचा दाणा व मातीआड गेलेला दाणा उतरून येऊन भातरोपे चांगल्या प्रकारे तरारू लागल्या. आदिवासी शेतकºयांनी लागवडी उरकून घेतल्यानंतर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भातरोपे सडून गेली, तर काही ठिकाणी बांध फुटून भातखाचरे गाडली गेली.
यानंतर दाट धुके व रोगट वातावरणामुळे या भातपिकांवर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे अत्यंत कडक पडणाºया उन्हामुळे भातपीक जळून गेले आहे. सध्या भातशिवारे ही भातकाढणीसाठी सज्ज झाली आहेत. तोच मागील पाच-सहा दिवसांपूर्वी पाऊस पडल्यामुळे भात भिजला. मोठ्या आशेने काबाडकष्ट करून पेरलेले पीक निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
४सध्या भीमाशंकर, आहुपे व पाटण खोºयामध्ये हळव्या पिकांच्या जातीमध्ये ढवळा, तांबकुड, कोळंबा, रायभोग या पिकांची काढण्यासाठी लगबग सुरू आहे. इंद्रायणी खडक्या आंबेमोहर, तांबडा, रायभोग या जातीची पिके काडात ओली असल्यामुळे पुढील आठवड्यापासून या जातीची पिके काढण्यात येणार असल्याचे आदिवासी शेतकºयांनी सांगितले. गºया जातींमध्ये जिर लहान खडक्या आंबेमोहर आदी जाती हिरव्या असल्यामुळे यांच्या काढणीला उशीरच होईल.
४चालूवर्षी भातपिकाला पाऊस योग्य वेळी न आल्याने त्याचप्रमाणे करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे भातपीक हे मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहे. यामुळे पळंज व पाकुड मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे भातपिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे.