शिवशाही बसचा उड्डाणपुलावर मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:30 AM2018-06-10T02:30:55+5:302018-06-10T02:30:55+5:30
धनकवडी - सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडी येथील श्री सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलवर बालाजीनगर परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस गेले दोन दिवस बेवारस अवस्थेत उभी आहे. यामुळे उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या वाहतूकीला एकीकडे अडथळा तर दुसरीकडे बसच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेली दोन दिवस सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा ठप्प झाली आसून मोठ्या प्रमाणात बस आगारात थांबून आहेत. संपामुळे प्रवास्यांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहनांचा पर्याय निवडला. दहावी चा निकाल , पुण्याच्या बाहेरून येणारा नोकर वर्ग , ज्येष्ठ नागरिक यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. त्याचवेळी उड्डाणपूलावर गेली दोन दिवस बंद असलेल्या बस कडे पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. बस मध्ये बिघाड झाल्यामुळे त्याच ठिकाणी बस थांबून चालकाने प्रवाशांना खाली उतरून चालक निघून गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र चालकाने ती बस ब्रेकडाऊन सर्हीस च्या साह्याने बस आगारात नेण्या ऐवजी उड्डाणपूलावर उभी केली आहे. यामुळे स्वारगेट कडून सातारा कडे जाणा?्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
रात्रीच्या वेळी बसचा इंडिकेटर सुरू नसल्याने बस उभी आहे की धावत आहे याचा अनेकांना अंदाज येत नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. दरम्यान स्वारगेट आगार व्यवस्थापक यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सातारा रस्ता उड्डाणपूलावर उभी असलेली शिवशाही बस पाहून आश्चर्य वाटत आहे. मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होत असलेल्या वाहतूक मार्गावर बस गेली दोन दिवस उभी आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- हेंमत डावळकर