शिवसृष्टीवरून राष्ट्रवादीत दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:12 AM2018-02-09T01:12:05+5:302018-02-09T01:12:12+5:30

बीडीपीच्या (जैवविविधता उद्यान) जागेवर शिवसृष्टी करण्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहेत.

From Shiva, two groups of NCP are divided into two groups | शिवसृष्टीवरून राष्ट्रवादीत दोन गट

शिवसृष्टीवरून राष्ट्रवादीत दोन गट

Next

पुणे : येथे बीडीपीच्या (जैवविविधता उद्यान) जागेवर शिवसृष्टी करण्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहेत. काँग्रेसने वेगळाच पवित्रा घेतला असून मुख्यमंत्र्यांनी हे केवळ गाजर दाखविले असल्याची टीका केली आहे. तर, भाजपाकडून ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवसृष्टीची उभारणी करणारच,’ असे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी (दि. ९) शिवसृष्टीच्या विषयावर महापालिकेत खास सभा होत आहे. सभेत या विषयावरचे सर्व राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून श्रेय घेण्याचा, तर विरोधातील राष्टवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी कसे गाजर दाखविले आहे, यावर टीकाटिप्पणी रंगण्याची शक्यता आहे.
मुंबई येथे झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांच्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी व कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचा डेपो, असा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसृष्टीसाठी प्रयत्नशील असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर हे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा हा तोडगा मान्य केला असून, त्याचे स्वागतही केले आहे.
मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच पर्यावरणाला हानिकारक असा हा निर्णय घ्यावा हे धक्कादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार चव्हाण या पर्यावरणाच्या खंद्या समर्थक असून बीडीपी आरक्षित जागेवर कसलेही बांधकाम करण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील माजी सभागृह नेते बंडू केमसे यांनीही शिवसृष्टीला विरोध केला आहे. बीडीपीच्या जागेवर कसलेही बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची मनाई आहे. त्यांचा आदेश रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहे; त्यामुळे बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी होऊच शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
>संपूर्ण जागा खासगी मालकीची
काँग्रेसने याबाबत वेगळीच भूमिका घेतली आहे. महापालिकेतील काँग्रेसचे गटेनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले, की या जागेवर शिवसृष्टी करणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. संपूर्ण जागा खासगी मालकीची आहे. सुमारे २०० मालक तिथे आहेत. त्यांना नुकसानभरपाई कशी देणार, नियम कसे बदलणार, एका बीडीपीला एक नियम व दुसºयाला दुसरा, याचे समर्थन कसे करणार? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांनी बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी हे फक्त गाजर दाखविले, आहे असे शिंदे म्हणाले.
>महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधी पक्ष काहीही म्हणत असले, तरी त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला आहे, असे सांगितले. हे नेते काहीच बोलले नाहीत व आता मात्र ते टीका करीत आहेत, ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली.
भाजपा कोणत्याही परिस्थितीत त्या जागेवर शिवसृष्टी करणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजपाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी शिवसृष्टीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे व पालिका पदाधिकाºयांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Web Title: From Shiva, two groups of NCP are divided into two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.