शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली पुढे अटलजी, अडवाणी आणि मोदींनी त्यावर कळस चढवला- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 12:44 PM2021-12-14T12:44:53+5:302021-12-14T13:25:53+5:30

भारतीय जनता पक्षात जे-जे संयम ठेवतात त्यांना सब्र का फल मीठा है याचा अनुभव येतो- चंद्रकांत पाटील

shivaji maharaj created hindutva vote bank atalji advani Modi culminated said chandrakant patil | शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली पुढे अटलजी, अडवाणी आणि मोदींनी त्यावर कळस चढवला- चंद्रकांत पाटील

शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली पुढे अटलजी, अडवाणी आणि मोदींनी त्यावर कळस चढवला- चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पुणे: वर्षानुवर्षे मेहनत घेऊन वोटबँक तयार केली जाते. ही वोटबँक संत-महंतपर्यंत पोहोचते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही हिंदुत्वाची वोटबँक तयार केली होती. त्यावर अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणी आणि मोदींनी कळस चढवला. त्यामुळे तिकीट पक्षाचे असते, वोटबँक पक्षाची असते. त्यामुळे कर्तुत्व पाहून एखाद्या व्यक्तीला तिकीट दिले जाते, असे सांगत भारतीय जनता पक्ष कुणावरही उगाच अन्याय करत नसल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या उमेदवारांची तिकीटं कापली त्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, तयार असलेली वोटबँक तुम्हाला मिळते, त्यासाठी थोडासा तुमचा चेहरा, तुमचं नाव त्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे माझं तिकीट कापलं म्हणून मी नाराज अशी कार्यपद्धतीच भाजपात नाही. परंतु एखाद्याचं तिकीट कापल्यानंतर माणूस म्हणून काही वेळ नाराज वाटतं. चंद्रकांत बावनकुळे यांच्या आयुष्यात त्या दिवशी काय प्रसंग आला होता त्याचा साक्षीदार मी आहे. परंतु त्या कुटुंबाने हे विष पचवलं आणि त्याचं यश त्यांना आज मिळालं. 

भारतीय जनता पक्षात जे-जे संयम ठेवतात त्यांना 'सब्र का फल मीठा है' याचा अनुभव येतो. विनोद तावडे, पंकजा मुंडे राष्ट्रीय राजकारणात गेल्या. भारतीय जनता पक्ष कुणावरही उगाच अन्याय करत नाही. काहीतरी कारण घडलेलं असतं. काळाच्या ओघात ते सर्व नीट करण्याचा पक्षाचा प्रामाणिक प्रयत्न असतो.

Web Title: shivaji maharaj created hindutva vote bank atalji advani Modi culminated said chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.