Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 :शिवाजीनगर विधानसभेत सिद्धार्थ शिरोळेंना सलग दुसऱ्यांदा संधी, बहिरट यांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:42 PM2024-11-23T16:42:09+5:302024-11-23T16:46:08+5:30

Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 :शिरोळे यांनी ८४,६९५ मते मिळवत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला असून ते सलग दुसऱ्यांदा येथून आमदार झाले आहेत

Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 Siddharth Shirole gets second consecutive term in Shivajinagar Assembly, Bahirat loses | Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 :शिवाजीनगर विधानसभेत सिद्धार्थ शिरोळेंना सलग दुसऱ्यांदा संधी, बहिरट यांचा पराभव

Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 :शिवाजीनगर विधानसभेत सिद्धार्थ शिरोळेंना सलग दुसऱ्यांदा संधी, बहिरट यांचा पराभव

Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा ३६,७०२ मतांच्या फरकाने पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. शिरोळे यांनी ८४,६९५ मते मिळवत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला असून ते सलग दुसऱ्यांदा येथून आमदार झाले आहेत.

२०  फेऱ्यांनंतर शिवाजीनगरची अंतिम आकडेवारी 

  • सिद्धार्थ शिरोळे (भाजप): ८४,६९५ मते (+३६,७०२)
  • दत्ता बहिरट (काँग्रेस): ४७,९९३ मते
  • मनीष आनंद (काँग्रेस बंडखोर): १३,०६१ मते
     

भाजपचा शिवाजीनगरमधील दबदबा कायम

सिद्धार्थ शिरोळे यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती, जी अखेरपर्यंत टिकून राहिली. काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी जोरदार प्रचार केला असला, तरी शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पक्ष संघटनेची ताकद मतदारसंघात वर्चस्व राखणारी ठरली. शिरोळे यांच्या सलग दुसऱ्या विजयाने पक्षाचा गड अधिक मजबूत झाला आहे.

स्वतंत्र उमेदवार प्रभावहीन

स्वतंत्र उमेदवार आनंद मनीष सुरेंद्र यांनी १३,०६१ मते मिळवली. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील थेट लढतीत पक्षातील बंडखोरीमुळे झालेल्या मतविभाजनाचा काँग्रेसला फटका बसला.

 इथे क्लिक करा >महाराष्ट्र विधानसभा २०२४

Web Title: Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 Siddharth Shirole gets second consecutive term in Shivajinagar Assembly, Bahirat loses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.