शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण: आमदार अनिल भोसलेंचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 10:16 IST2023-01-02T10:15:56+5:302023-01-02T10:16:48+5:30
तात्पुरता जामिनाचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला...

शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण: आमदार अनिल भोसलेंचा जामीन फेटाळला
पुणे : शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांचा वैद्यकीय उपचारासाठी केलेला तात्पुरता जामिनाचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा निर्णय दिला.
आमदार भोसले यांनी किडनीच्या आजाराचे उपचार ससून रुग्णालयात उपलब्ध नाहीत ते केवळ रुबी हॉल व पूना हॉस्पिटलमध्ये होत असल्याने हे उपचार करून घेण्यासाठी तात्पुरता जामीन देण्यासाठी अर्ज केला होता. त्याला गुंतवणूकदारांचे वकील सागर कोठारी व सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला.
याप्रकरणात भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले या आरोपी असून त्या अजून फरारी आहेत. तसेच इतर १२ आरोपींना अद्याप अटक झाली नाही. आरोपी भोसले हे नियमानुसार सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात, असा युक्तिवाद ॲड. विलास पठारे यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.