शिवनेरी गडास झळाळी!

By admin | Published: February 17, 2015 11:31 PM2015-02-17T23:31:12+5:302015-02-17T23:31:12+5:30

किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेली दगडी फरसबंदी वाट शिवनेरीच्या गतकालीन वैभवाची आठवण करून देत आहे.

Shivneri road is bright! | शिवनेरी गडास झळाळी!

शिवनेरी गडास झळाळी!

Next

लेण्याद्री : किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेली दगडी फरसबंदी वाट शिवनेरीच्या गतकालीन वैभवाची आठवण करून देत आहे. नव्याने मजबुतीकरण करण्यात आलेल्या गडाचे सात दरवाजे शिवप्रेमी-दुर्गप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
स्वराज्यद्रोही गुन्हेगारांना देहदंडाची शिक्षा देण्यात येत
असलेला कडेलोट कडा आता आकर्षक ‘व्हू पॉर्इंट’ बनला आहे. तर, पूर्वी दगडगोटे, पडके अवशेष यांच्या सोबतीने जाणारी पायवाट आता हिरवळीचा गालीचा, आकर्षक फुलांचे ताटवे यांच्या सोबतीने शिवनेरीची चढण अधिकच सुकर होत आहे. हे चित्र आहे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरील.
दुर्गराज शिवनेरीवरील विविध दुर्गसंवर्धक विकासकाने आता पूर्णत्वास येत असून, गडाला शिवकालीन ऐतिहासिक झळाळी प्राप्त झाली आहे. ऐतिहासिक दुर्गबांधणीतील एक ‘मॉडेलफोर्ट’ म्हणून किल्ले शिवनेरीची ओळख बनली आहे. किल्ले शिवनेरीचे हे पालटलेले रूप राज्यातील इतर किल्ल्यांच्या संवर्धनाला चालना देणारे ठरणारे आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीला राष्ट्रीय स्थळाचा दर्जा केंद्र शासनाने दिलेला आहे.
दगडमातीच्या ढिगाऱ्यांच्या अवशेषरूपाने उरलेल्या ऐतिहासिक वास्तू, अशी शिवनेरीची सन २००४ पर्यंतची परिस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग, महसूल विभाग, सार्वजनिक
बांधकाम विभाग, भारतीय पुरातत्त्व विभाग, किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळ यांच्या माध्यमातून शिवनेरीस आजचे शिवकालीन दुर्गबांधणीचे ‘मॉडेलफोर्ट’ बनविण्याचा प्रकल्प सन २००४ पासून हाती घेण्यात आला. सामाजिक रेटा व राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीमुळे शिवनेरीचे विलोभनीय रूप
आज समोर येत आहे. शिवनेरीवर विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. तर, काही कामे पूर्णत्वास आलेली आहेत. (वार्ताहर)

४शिवजन्मस्थळ इमारतीची विशेष देखभाल करण्यात येत आहे. विद्रूप केलेल्या विविध वास्तूंच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या आहेत.
४वीजरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
४शिवजन्मस्थानासमोरील संपूर्ण प्रांगणामध्ये दगडी फरसबंदी नजरेला सुखावते. अंबारखाना, कोळी चौथरा, ईदगाह आदी वास्तूंची दुरुस्ती-संवर्धनाचे नियोजन आहे.
४शिवनेरीच्या पायथ्याशी ६० लाख खर्चाचे आकर्षक घडीव दगडी बांधणीतील वेस (प्रवेशद्वार) बांधण्यात आले आहेत. गावात शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.

४वनविभागाच्या वतीने पाच किलोमीटर लांबीची संरक्षक दगडी बांधणीतील भिंत उभारण्यात आलेली आहे. गडावर आकर्षक ‘लॅँडस्केपिंग’ करण्यात आले आहे. आकर्षक बागबगीचा फुलविण्यात आला आहे. मृदृसंधारणाची कामे पूर्णत्वास येत आहेत. किल्ल्यावर बारमाही पाण्यासाठी वडज धरणातून ४० लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेली आहे.
४भारतीय पुरातत्त्व विभागाने गडावरील विविध वास्तूंची ऐतिहासिक धाटणीत पुनर्रभरणा केली आहे. यामध्ये गडावर जाणाऱ्या पूर्ण पायरी मार्गावर, सपाटीवर घडी व दगडातील फरसबंदी करण्यात आली आहे. सातही दरवाज्यांची आवश्यक ठिकाणी पुनर्बांधणी करण्यात आली आहे. गडावरील बुरुंजयुक्त वेशींना मजबूत वजनदार सागवानी दरवाजे बसविण्यात आले आहेत. धोकादायक कडेलोट कड्याचे रूपांतर आकर्षक ‘व्ह्यू पॉर्इंट’मध्ये करण्यात आले आहे.

Web Title: Shivneri road is bright!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.