शिवरायांचा आठवावा प्रताप... माजी मंत्री, आमदार, सभापतींचा मिरवणुकीत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:09 AM2019-02-20T00:09:44+5:302019-02-20T00:10:09+5:30

इंदापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश : माजी मंत्री, आमदार, सभापतींचा मिरवणुकीत सहभाग

Shivrajaya's eighth pratap ... Ex-minister, MLAs and participants in procession | शिवरायांचा आठवावा प्रताप... माजी मंत्री, आमदार, सभापतींचा मिरवणुकीत सहभाग

शिवरायांचा आठवावा प्रताप... माजी मंत्री, आमदार, सभापतींचा मिरवणुकीत सहभाग

Next

इंदापूर : शहरातील सकल शिवभक्त परिवार आणि विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्या वतीने इंदापूर शहरातून मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. तर अनेक मुलींनी मिरवणुकीत शिवरायांची पालखी खांद्यावर घेतली होती.

यामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर इंदापूर पोलिसांनी मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवल्याने इंदापूरमध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता मिरवणुका शांततेत पार पडल्या. त्यामुळे इंदापूरच्या शिवजयंती मिरवणुकीने राज्यात आदर्श निर्माण करून दिला आहे. मिरवणुकीच्या सुरुवातीला इंदापूर महाविद्यालयासमोरील आवारात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करून, महिलांनी शिव पाळणा गायला. या वेळी राधिका माध्यमिक विद्यालयाच्या ४० मुलींच्या लेझीम पथकाने शरद झोळ, मुख्याध्यापक हनुमंत बोंगाने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लेझीमचे खेळ दाखवले. त्यानंतर वकीलवस्ती येथील धुमाळ गोंधळी पथक व पोतराजच्या जथ्याने आपली पारंपरिक प्रथा सादरीकरण केले. त्यानंतर महाराणा ढोलताशा पथक (जुन्नर) यांनी जल्लोषात वादन करून वातावरण शिवमय केले.
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे तज्ज्ञ संचालक मंगेश पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, काँग्रेस कमिटी शहाराध्यक्ष बापूराव जामदार, युवानेते महेंद्र रेडके, शेखर पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
राजेवलीनगर येथे अरबाज शेख मित्र परिवाराच्या वतीने लहान मुलांनी पोवाडा गायला व अंजूम शेख हिने छत्रपती शिवरायांचा वेष परिधान केला होता.

या वेळी शिवजयंती निमित्ताने शैक्षणिक गुणवत्तेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, शहराध्यक्ष अनिल राऊत, प्रसिद्धी प्रमुख वसंत आरडे, बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अमर गाडे, स्वप्निल राऊत, डॉ. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मुख्य शिवजयंती मिरवणुकीत सहभाग घेतला. दर्गा मस्जिद चौकात मुस्लिम बांधव व युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले. यामध्ये प्रशांत शिताप, भाजपाचे चांद पठाण, मेहबुब मोमीन, मुन्नाभाई बागवान, अ‍ॅड. आसिफ बागवान व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर चौगुले, प्रा. कृष्णा ताटे, बाळासाहेब सुतार, गणपत पाटील, राजेंद्र चव्हाण, नगरसेवक स्वप्निल राऊत, अमर गाडे व आदी प्रवासी, नागरिक व चालक-वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीला सकाळी १०.३० वाजता इंदापूर महाविद्यालयासमोरून सुरुवात होऊन पुढे टेंभुर्णी नाका, सावतामाळीनगर, दर्गा मस्जिद चौक, नेहरू चौक, मुख्य बाजारपेठ, खडकपूर, शिवाजी चौकमार्गे श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे येऊन इंदापूर कॉलेजसमोर दुपारी २.४५ वाजता
समारोप करण्यात आला.

या वेळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मूर्तीची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत उंट, घोडे, बैलगाड्या, गोंधळी, पोतराज, मावळे , वारकरी पंथ, वारकरी पथकधारी, वासुदेव व शहरवासीय हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातून २०० ते ३०० तरुणांनी मोटारसायकलला भगवे झेंडे लावून रॅली काढून संपूर्ण इंदापूर भगवामय वातावरण निर्माण केले होते. मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

४इंदापूर शहरातील सावतामाळीनगर येथे महात्मा फुले ग्रुपच्या वतीने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खाजाभाई बागवान, नवाजभाई बागवान यांनी सरबत बनवले, नगरसेवक पोपट शिंदे, गजानन गवळी, रमेश शिंदे, गौरव राऊत, शरद शिंदे, हाजी बानेखान शेख, आदी मान्यवरांनी मिरवणुकीतील शिवभक्तांना सरबत
वाटप केले.

एसटी कर्मचाऱ्यांनी
साजरी केली शिवजयंती
राजगुरुनगर : एसटी बसस्थानकावर एसटी कर्मचाºयांनी शिवजयंती साजरी केली. या वेळी आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. ंछत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा व हिंदवी स्वराज्य स्थापनेचा पराक्रम सांगून कर्मचाºयांनी आपल्या कर्तव्याप्रति जागरूकता ठेवून चारित्र्यसंपन्न राहावे असे आवाहन हांडे यांनी केले.या वेळी स्थानक प्रमुख उज्ज्वला टाकळकर, सहायक वाहतूक निरीक्षक युवराज गेंगजे, कुंडलिक बेंढाले, कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश सातकर, सचिव दिनकर होले, सोसायटी संचालक दिलीप तापकीर, दिलीप चौधरी, दत्तात्रय गभाले, रमेश तापकीर, अमित जगताप, मनीषा सुतार, वर्षा बनकर, स्वाती
बिरादार, नीलम टाव्हरे, राजेंद्र
रावते, दत्ता गभाले, रंगनाथ ढोरे, रवींद्र
राठोड, एम. डी. शिंदे, संदीप
गावडे, सतीश दळवी, राजेंद्र
कहाणे, मधुकर खंडारे, सुरेश राक्षे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
 

Web Title: Shivrajaya's eighth pratap ... Ex-minister, MLAs and participants in procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.