पारंपरिक अभिषेकाने साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:01+5:302021-06-24T04:09:01+5:30
विश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी ...
विश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
सोहळ्याला विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, संजय मुरदाळे, रा.स्व.संघाचे सिंहगड भागाचे संघचालक महेश लेले, कार्यवाह मंगेश पाटील, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, शरद जगताप, तुषार कुलकर्णी, श्रीकांत चिल्लाळ, केतन घोडके, समीर रुपदे, श्रीपाद रामदासी, धनंजय गायकवाड, नितीन महाजन, नाना क्षीरसागर, अमर सातपुते, साईनाथ कदम, राजू कुडले, योगेश देशपांडे, सचिन कांबळे, नीलेश निवळकर, सचिन लोखरे उपस्थित होते. शिवकथाकार समाजरत्न ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांचे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील व्याख्यान झाले. सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष आहे.
ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी व त्यांचे सहकारी सरदार, मावळे यांनी मोठा पराक्रम गाजवून अनेक गड-किल्ले स्वराज्यात आणले. त्यांच्या पराक्रमाची आठवण ठेवत शिवराज्याभिषेकासारखे कार्यक्रम तारखेने न साजरे करता, आपल्या संस्कृतीनुसार तिथीने साजरे करायला हवेत. तसेच तरुण पिढीला शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देत इतिहासदेखील सांगायला हवा.”