Vikram Gokhale: '...तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते'; विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 04:13 PM2021-11-14T16:13:53+5:302021-11-14T16:16:25+5:30

vikram gokhale: शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न मी तेव्हा विचारले होते, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले.

shivsena bjp alliance break up Devendra fadnavis said that was my mistake says vikram gokhale | Vikram Gokhale: '...तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते'; विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर गौप्यस्फोट

Vikram Gokhale: '...तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते'; विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर गौप्यस्फोट

Next

पुणे-

शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न मी तेव्हा विचारले होते, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले. ते पुण्यात ब्राम्हण महासंघाद्वारे त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विक्रम गोखले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राजकीय मुद्द्यांवर रोखठोक विधानं केली. ज्या मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा आणि शिवसेना दुरावले त्या प्रसंगाबाबत विक्रम गोखले यांनी एक गौप्यस्फोटच यावेळी केला. 

"शिवसेना-भाजपा एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न करत आहे. युती झाली त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना थेट विचारणा केली होती. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी दिलं असतं तर काय बिघडलं असतं? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची? असंही मी त्यांना म्हटलं होतं", असं विक्रम गोखले म्हणाले. त्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया काय होती? असं विक्रम गोखले यांना विचारण्यात आलं असता फडणवीसांनी झाली चूक असं म्हटलं होतं, असा दावा गोखले यांनी केला. 

एकट्या फडणवीसांची चूक नाही
"फडणवीसांनी तेव्हा झाली चूक असं मला म्हटलं होतं. पण खरंतर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना तुम्ही फसवू शकत नाही. कारण मग लोक कधीतरी त्याची प्रचंड शिक्षा तुम्हाला करतात. ती आता आपण भोगत आहोत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि  म्हणूनच मी कोणत्याही राजकीय पक्षाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश वगैरे झुगारुन देतो", असं गोखले म्हणाले. 

भाजपा-शिवसेनेनं एकत्र यायला हवं
"शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे", असंही विक्रम गोखले म्हणाले आहेत. 

"चुकलेलं गणित नीट करायचं असेल. तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे. त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही", असंही ते म्हणाले. 

Web Title: shivsena bjp alliance break up Devendra fadnavis said that was my mistake says vikram gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.