शिवसेना-भाजपात जागांवरून ताणाताणी
By admin | Published: December 9, 2014 12:14 AM2014-12-09T00:14:19+5:302014-12-09T00:14:19+5:30
पुणो कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीसाठी भाजपा 8 पैकी 5 आणि रिपब्लिकन पक्षासाठी 1 अशा 6 जागांची मागणी करीत असल्याचे आज पुढे आले.
Next
पुणो : राज्यात जागावाटपावरून शिवसेना-भाजपामध्ये सुरू झालेल्या घोळाची परिणती युती तुटण्यात झाली होती. त्या तुटीचा अनुभव स्थानिक पातळीवर कायम असून, पुणो कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीसाठी भाजपा 8 पैकी 5 आणि रिपब्लिकन पक्षासाठी 1 अशा 6 जागांची मागणी करीत असल्याचे आज पुढे आले.
प्रादेशिक पातळीवर सेना-भाजपामधील वाद कॅन्टोन्मेंट निवडणुका लागू झाल्यानंतर कायम होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली. भाजपाने सर्व इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. शिवसेनेच्या मुलाखती पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार झाल्या नाहीत. नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी या निवडणुका युती करून व्हाव्यात, असे विधान केले असून, दोन्ही पक्षांचे नेते नागपूरमध्ये याविषयी निर्णय घेणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या सूत्रंकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता जागावापट कसे होणार हा प्रश्न आहे.
या दोनही पक्षाच्या स्थानिक कार्यकत्र्याशी अनेक वेळा संपर्क साधला मात्र त्यांनी याविषयी अधिक माहिती सांगण्यास नकार दिला. आज सूत्रंकडून समजलेल्या माहितीनुसार शिवसेनेसाठी पुणो कॅन्टोन्मेंटमध्ये केवळ 2 वॉर्ड सोडण्यासाठी भाजपा तयार असल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने याबाबत नापसंती व्यक्त केली असून ते वरीष्ठांची चर्चा करणार असल्याचे समजते.
अर्ज भरण्यासाठी उद्यापासून केवळ 24 तासांचा अवधी शिल्लक असताना हा पेच उद्भवला असल्याने स्थानिक पातळीवरील निवडणुका दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध निवडणुक लढवतील, अशी चिन्हे यानिमित्ताने पहायला मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या मुलाखती पार पडल्या असून, उमेदवारांची निश्चिती झाली आहे. या निवडणुकीसाठी निरीक्षक आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ए. बी. फॉर्म एक दिवस आधी देण्याची काँग्रेसने तयारीही केली आहे.
(प्रतिनिधी)
4महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुरेसे उमेदवार मिळत नसल्याने याही पक्षाचा पूर्वनियोजित मुलाखतींचा कार्यक्रम अद्याप होऊ शकलेला नाही.
4मात्र, वॉर्ड क्रमांक 5 मधून या पक्षाचा एक कार्यकर्ता पक्ष चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून, तसे पत्र त्याने राज ठाकरे यांना पाठविले असल्याचे सांगण्यात येते.