पर्वतीवर शिवसेनेचा दावा

By admin | Published: September 17, 2014 12:18 AM2014-09-17T00:18:41+5:302014-09-17T00:18:41+5:30

विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीचा तिढा कायम आहे. या पाश्र्वभूमीवर, भाजपाकडील पर्वती मतदारसंघावर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका:यांनी दावा केला.

Shivsena claims on mountain range | पर्वतीवर शिवसेनेचा दावा

पर्वतीवर शिवसेनेचा दावा

Next
पुणो : विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीचा तिढा कायम आहे. या पाश्र्वभूमीवर, भाजपाकडील पर्वती मतदारसंघावर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका:यांनी दावा केला. त्यासाठी मतदारसंघातील प्रमुख पदाधिका:यांची बैठक आज झाली. 
महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपाकडून जादा जागांसाठी शिवसेनेवर दबाव सुरू आहे. त्यामुळे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची चाचपणी करण्यास पदाधिका:यांना सांगितले. या पाश्र्वभूमीवर, पर्वती मतदारसंघातील उपशहर प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, उद्योग सेना, नगरसेवक व कार्यकत्र्याची  बैठक मुकुंदनगर येथील झांबरे पॅलेस येथे मंगळवारी सायंकाळी झाली. या वेळी शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, महिला उपशहर प्रमुख गीता मोहोरकर, अजरुन जानगवळी, अनिल हतागळे हे पदाधिकारी उपस्थित होते. 
शहरातील आठपैकी वडगावशेरी, हडपसर, कोथरूड व कॅन्टोन्मेंट मतदारसंघ शिवसेनेकडे व उर्वरित 4 मतदारसंघ भाजपकडे आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आहेत; परंतु या मतदारसंघात सेनेची ताकद आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेतून हरणावळ, ओसवाल व पुजारी यांच्यापैकी एकाला देण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे 
यांना भेटण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (प्रतिनिधी)
 
शहरातील युतीच्या जागावाटपानुसार वडगावशेरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे; परंतु काही दिवसांपासून वडगावशेरी मतदारसंघावर भाजपामधील इच्छुक दावा करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर, वडगावशेरीच्या बदल्यात भाजपाचा पर्वती मतदारसंघ शिवसेनेला घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

 

Web Title: Shivsena claims on mountain range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.