शिवसेना खराडीतील घराणेशाही संपविणार

By admin | Published: February 16, 2017 03:33 AM2017-02-16T03:33:34+5:302017-02-16T03:33:34+5:30

खराडी-चंदननगरमधील कार्यकर्त्यांना केवळ कामापुरते वापरून घेणाऱ्या नेत्यांना मतदार योग्य धडा शिकवतील. प्रचारापुरते कार्यकर्ते

Shivsena Kharadi family dynasty will be finished | शिवसेना खराडीतील घराणेशाही संपविणार

शिवसेना खराडीतील घराणेशाही संपविणार

Next

पुणे : खराडी-चंदननगरमधील कार्यकर्त्यांना केवळ कामापुरते वापरून घेणाऱ्या नेत्यांना मतदार योग्य धडा शिकवतील. प्रचारापुरते कार्यकर्ते आणि पदासाठी घरचे, असे धोरण राबविणाऱ्या नेत्यांचे सर्व डाव शिवसेनेच्या झंझावातापुढे फोल ठरणार आहेत. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे परिवर्तनाला साथ द्यावी, असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे यांनी केले.
शिवसेनेच्या खराडी-चंदननगर प्रभाग क्र. ४ मधील चारही उमेदवार संतोष भरणे, संध्या पठारे, मीनाक्षी सुरेश शेजवळ, सुनील पठारे यांनी खराडीगाव, तसेच पाटीलबुवावस्तीत धीरज पठारे, कानिफ भरणे, सुरेश शेजवळ, साधू थोरात, विनोद करताल, राजू सावंत, आत्माराम धुमाळ, मोहंमद शेख, प्रसाद जठार, बापू कदम, काळुराम थोरात, अविनाश शुक्रे, पंकज दाणेकर, प्रमोद करतात, प्रदीप ढोकळे, विशाल खोपकर, भारती शेजवळ, वैशाली चात्तर, अभिषेक शेजवळ, मीनाक्षी धुमाळ, कविता करताल, माधवी कदम, सुजाता परदेशी यांच्यासह पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला.
भरणे म्हणाले, ‘‘जनतेला आता रिझल्ट पाहिजेत. ते शिवसेनाच देऊ शकते. गणेशनगरच्या पट्ट्यापासून ते खराडीच्या हद्दीपर्यंत राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. महिलांना संरक्षण देणारी, तरुणींना निर्भय बनविणारी शिवसेना खराडीत नवे पर्व सुरू करणार आहे. घराणेशाहीच्या पालख्या वाहण्याची वेळ कार्यकर्त्यांवर येणार नाही. शिवसेनेचे नव्या दमाचे आणि नव्या रक्ताचे कार्यकर्ते सदैव आपल्या सेवेत राहतील, याची खात्री बाळगा.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena Kharadi family dynasty will be finished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.