कचरा आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादीची उडी

By admin | Published: May 5, 2017 03:04 AM2017-05-05T03:04:36+5:302017-05-05T03:04:36+5:30

कचरा समस्येवर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यापाठोपाठ

Shivsena, NCP's jump in garbage agitation | कचरा आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादीची उडी

कचरा आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादीची उडी

Next

पुणे : कचरा समस्येवर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यापाठोपाठ आता शिवसेनेनेही उडी घेतली.
‘शहरभर कचरा... अच्छे दिन विसरा..,’ ‘महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट परदेश दौऱ्यावर पुणेकर वाऱ्यावर’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर ठाण मांडले. सत्ताधारी भाजपाला कचऱ्याचा विषय हाताळण्यात अपयश आले आहे, अशी टीका या वेळी गटनेते संजय भोसले यांनी केली. सत्ताधाऱ्यांना जाग यावी, यासाठी थाळीनाद, घंटानाद करण्यात आला.
या आंदोलनात माजी गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, नाना भानगिरे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट, माजी नगरसेवक विजय देशमुख, संजय मोरे, सुनील चव्हाण, गजानन पंडित, गणेश देवरे, श्याम ननवरे, राजेंद्र शिंदे, रुपेश पवार, मंगेश म्हेत्रे, सुरेश पवळे, भाऊसाहेब कापडी, प्रमोद गोरे, मंकरद पेठकर, संजय वाल्हेकर, राजेश परदेशी याच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.
एकोणीस दिवस रखडलेल्या या विषयासंदर्भात खासदार सुळे यांनी गुरुवारी दुपारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी आयुक्तांनाही काही ठोस उत्तर दिलेले नाही, असे सांगितले. हा विषय सुटावा, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छाच दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री तीन-तीन वेळा संपर्क साधूनही वेळ देत नाही. आता याच प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांनाही टॅग केले आहे. ते कधी उत्तर देतात याची प्रतीक्षा करत आहे.’’
राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्तेत असाताना काही केले नाही, याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, ‘‘चुका मान्य करूनच सहकार्याचा हात पुढे करत आहोत, मात्र तो द्यायचा कोणाच्या हातात? खासदार, आमदार करतात काय, असे मी विचारणार नाही, कारण मी माझे काम करत आहे. ग्रामस्थांबरोबर चर्चा करून आता आयुक्तांशी बोलण्यासाठी आले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. मात्र प्रश्न सोडवायचा असेल तर सत्ताधारी हवेत व तेच नाहीत, त्याला कोण काय करणार?’’(प्रतिनिधी)

संवाद करायचा कोणाशी?
देशाच्या स्वच्छतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेतला आहे व त्यांचे पुणे शहरातील प्रतिनिधी पुण्याचा कचराप्रश्न वाऱ्यावर सोडून परदेशात फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांना तीन वेळा या विषयावर टॅग केले, मात्र कपिल शर्माच्या वैयक्तिक प्रश्नासाठी सगळी मुंबई महापालिका कामाला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकदाही संपर्क केला नाही, त्यामुळे आता या विषयावर संवाद करायचा कोणाशी, असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

Web Title: Shivsena, NCP's jump in garbage agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.