Video: पुण्यात शिवशाही बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:21 PM2022-11-01T12:21:59+5:302022-11-01T12:22:58+5:30

चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Shivshahi bus catches fire in Pune All passengers are safe | Video: पुण्यात शिवशाही बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुरक्षित

Video: पुण्यात शिवशाही बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुरक्षित

googlenewsNext

पुणे: पुण्यातील येरवडा येथे शास्त्री चौकात शिवशाही बसने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ ते चिंचवड अशी शिवशाही बस येरवड्याच्या शास्त्री चौकातून चालली होती. त्यावेळी गाडी अचानक खराब झाली. चालकाला हि गोष्ट कळताच त्याने तातडीने गाडी बाजूला घेतली. व त्यामध्ये असणाऱ्या ४२ प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर शिवशाहीने लगेच पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. व सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. अग्निशमन दलानेआग विझवली आहे. गाडीने का पेट घेतला याबाबत एसटी महामंडळ माहिती घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  

Web Title: Shivshahi bus catches fire in Pune All passengers are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.