५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:07+5:302021-06-04T04:10:07+5:30

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातल्या ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा होणार आहे. ...

Shivshak Rajdand Gudi with saffron flag on 51 forts | ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड गुढी

५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड गुढी

Next

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातल्या ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा होणार आहे. प्रत्येक गडाशी निगडित असलेल्या वीर घराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे.

‘गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे स्वराज्यदिन’ सोहळ्याचे संकल्पक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी ही माहिती दिली.

पुण्यात दर वर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारून पूजन होणार आहे. नुकतेच एसएसपीएम संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्यदिव्य अश्वारुढ स्मारकाजवळील जगातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरुपात पासलकर, जेधे, कंक, बांदल, मालुसरे, शिळीमकर, गोळे, गायकवाड, पायगुडे, मरळ, जगताप, धुमाळ, हांडे, जाधवराव, पवार या स्वराज्य घराण्यातील सदस्यांना भगवा स्वराज्यध्वज गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अमित गायकवाड म्हणाले की, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करून राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळीत रिता करून रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समाधानाने भरली. म्हणूनच ६ जून स्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी २०१३ पासून भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून साजरा केला जात आहे.

अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती गोळे, रवींद्र कंक, गणेश जाधव, समीर जाधवराव, अशोक सरपाटील, प्रवीण गायकवाड, संतोषराजे गायकवाड, सागर पवार, राजू सातपुते, संतोषराजे शिंदे आदींनी सोह‌ळ्याचे आयोजन केले आहे.

चौकट

स्वराज्यध्वजाची निर्मिती

शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे. शिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड, रायरेश्वर, तुंग-तिकोणा, पुरंदर, रोहिडेश्वर, पन्हाळा, रामशेज, संग्रामदुर्ग, लोहगड, रोहिडा, मल्हारगड, विसापूर, चाकण, राजमाची, इंदुरी, मोरगिरी, कोरीगड, धनगड, कैलासगड, तैलबैला, सोनेरी, वज्रगड, केंजळगड, मोहनगड, कावळा, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, कमळगड, पांडवगड, कलनिधी, विशाळगड, भुदरगड, सामानगड, भैरवगड, जीवधन, वसंतगड या गडांवर सोहळा साजरा होणार आहे.

Web Title: Shivshak Rajdand Gudi with saffron flag on 51 forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.