शॉक लागून गाईचा मृत्यू
By admin | Published: July 6, 2017 02:49 AM2017-07-06T02:49:24+5:302017-07-06T02:49:24+5:30
येथील पांढरेवाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका शेतात रमेश भोसले यांची गाय चरत होती. विजेच्या खांबावरील तारा अचानक तुटून
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : येथील पांढरेवाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका शेतात रमेश भोसले यांची गाय चरत होती. विजेच्या खांबावरील तारा अचानक तुटून गाईच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गाईला बांधलेला दोर भोसले यांच्या हातात असल्यामुळे त्यांनादेखील जोराचा झटका बसला.
कुरकुंभ परिसरात सध्या फक्त ढगाळलेले वातावरण आहे. सोसाट्याचा वारा सुटत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेच्या तारा एकमेकींना लागून घर्षण होत आहे.
वरील अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अगदी जवळच
५ ते ६ फुटांवर असणाऱ्या घरांवर जर या तारा पडल्या असत्या मोठी हानी झाली असती.
कुरकुंभ पांढरेवाडीला
असणाऱ्या कृषीपंपांना (एजी) वीजपुरवठा करण्यासाठी ११ केव्हीची विजेच्या तारा या ठिकाणी टाकण्यात आल्या आहेत. मात्र, काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या विजेच्या तारांमधील वीजप्रवाह आपोआप बंद होत
नाही. त्यामुळे या संदर्भात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे गरज आहे.
वीज मंडळ जबाबदार
कुरकुंभ परिसरातील असणाऱ्या विजेच्या तारांना गार्डिंगची
आवश्यकता असून, बहुतांश ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने तारा जोराने एकमेकींना घर्षण होत असतात. आपत्कालीन परिस्थितीत आपोआप बंद होण्याची (ट्रिप) व्यवस्था कार्यान्वित नाही. त्यामुळे अशा घटनेला वीज मंडळ जबाबदार असून, शेतकऱ्याला नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.
- राहुल भोसले, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड