पुण्यात राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविकेचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 07:29 PM2022-08-09T19:29:19+5:302022-08-09T19:34:22+5:30
रेखा टिंगरे या कळस धानोरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेळेस नगरसेविका राहिल्या आहेत.
चंदननगर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रेखा टिंगरे या कळस धानोरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेळेस नगरसेविका राहिल्या आहेत.
रेखा टिंगरे ह्या 2007, 2012,2017 ह्या सलग तिन वेळा धानोरी-विश्रांतवाडी भागातून निवडून येत आहेत. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्काच आहे. रेखा टिंगरे यांचे भावकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे असुन देखील त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. रेखा टिंगरे यांची कन्या कोमल कुटे-टिंगरे ,पती यांनीही यापुर्वीच भाजपात प्रवेश केला होता. रेखा टिंगरे ह्या केवळ पक्षांअंतर्गत कायदा मुळे त्या राष्ट्रवादीत होत्या. आता नगरसेवकपदाचा कार्यकाळही पुर्ण झाल्याने त्यांनी प्रवेश केला. याबाबत रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
''२०१९ विधानसभा निवडणुकीत यांनी भाजपला मदत करून एकप्रकारे भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. त्यांना त्यांच्या भावी कारकर्दीस शुभेच्छा. - सुनिल टिंगरे,आमदार वडगावशेरी विधानसभा''