धक्कादायक! दारुड्या वडिलांचा १६ वर्षीय मुलाने डोक्यात लोखंडी घण घालून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:00 AM2021-08-11T11:00:13+5:302021-08-11T11:06:10+5:30

खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

Shocking! A 16-year-old boy killed his drunken father by stabbing him in the head | धक्कादायक! दारुड्या वडिलांचा १६ वर्षीय मुलाने डोक्यात लोखंडी घण घालून केला खून

धक्कादायक! दारुड्या वडिलांचा १६ वर्षीय मुलाने डोक्यात लोखंडी घण घालून केला खून

googlenewsNext
ठळक मुद्देवडील मुलाला दररोज शिवीगाळ व मारहाण करीत असे घटनेमुळे दावडी परिसरात खळबळ उडाली

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पुर्व भागातील दावडी येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने वडील दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करत असल्याच्या कारणावरुन वडीलाच्या डोक्यात लोखंडी घण घालून खुन केल्याची घटना घडली आहे.

संतोष वाघिरे ( वय ४३ )रा. कान्हुरकरमळा, चिंचोशी रोड, (ता. खेड ), असे खून झालेल्या चे नांव आहे. या घटनेमुळे दावडी परिसरात खळबळ उडाली आहे. हि घटना दि. १० मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावडी गावचे हद्दीत कान्हुरमळा, चिंचोशी रोड, येथे मयत संतोष वाघिरे व त्यांचा १६ वर्षीय लहान मुलगा राहत होते. त्यांचा या म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय आहे. वडिल संजय वाघिरे हे रोज दाऊ पिऊन १६ वर्षीय मुलाला शिवीगाळ मारहाण करून काम करण्यास लावत होते.

१० तारखेला संजय वाघिरे १६ वर्षीय मुलाला दिवसभर शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर जेवायला न देता रात्री गोठयामध्ये झोपायला लावले. या कारणावरून मुलाला राग आल्याने गोठयातील लोखंडी घणाने संतोष वाघिरे यांच्या डोक्यात घाव घालून खून केला.

या घटनेबाबत मोठा भाऊ आदिनाथ संतोश वाघिरे, (वय २० ) रा कान्हुरमळा, चिंचोशी रोड, दावडी, (ता. खेड ) यांनील लहाण भावाच्या विरोधात वडीलाच्या खुनाची फिर्याद दिली आहे. घटनास्थळी खेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार सचिन गिलबिले यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करित आहे

Web Title: Shocking! A 16-year-old boy killed his drunken father by stabbing him in the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.