खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 03:20 PM2021-08-17T15:20:44+5:302021-08-17T15:24:47+5:30

शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्या, पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील घटना

Shocking! A 19 year old girl went to start an electric pump in a field; Found dead in the well in the evening | खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली 

खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली 

Next

मंचर: कळंब (ता.आंबेगाव) येथील गणेशवाडी वस्तीवर शुभांगी भालेराव ही तरुणी वीजपंप सुरू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली होती. ती बराच वेळ घरी परतली नाही.शेजाऱ्यांनी तिला विहिरीकडे जाताना पाहिले होते.याबाबतची माहिती कुटुंबीयांना देताच त्यांनी शोधाशोध केली.त्यावेळी विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला. शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्याने बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

शुभांगी संजय भालेराव (वय १९) या तरुणीचा आज सोमवारी बिबट्याच्या हल्ल्यात विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र, तरुणीच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर खरे कारण समोर येणार आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी भालेराव ही तरुणी वीजपंप सुरू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली होती. ती बराच वेळ घरी परतली नाही.शेजाऱ्यांनी तिला विहिरीकडे जाताना पाहिले होते.याबाबतची माहिती कुटुंबीयांना देताच त्यांनी शोधाशोध केली.त्यावेळी विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला.शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्याने बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.सदर घटनेचा तपास मंचर वनविभाग अधिकारी करीत आहेत.शुभांगी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 
बिबट्याच्या हल्ल्यात विहिरीत पडून शुभांगी संजय भालेराव या तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तर वनखात्याने तपासानंतर मृत्यूचे मूळ कारण पुढे येईल असे सांगितले आहे.

घटनास्थळी मंचर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच कळंब येथील माजी सभापती वसंतराव भालेराव,भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे ,उपसरपंच डॉ. सचिन भालेराव,उद्योजक नितीन भालेराव  यांच्यासह वाडीवस्तीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे म्हणाले शुभांगी भालेराव हीचा मृत्यु बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.या भागात बिबट्याचा वावर असतो.या तरुणीच्या चेहर्‍यावर,कानावर जखमा आहे. मात्र त्या जखमा खोलवर नाही. ती वीज पंप सुरू करण्यासाठी विहिरीवर गेली होती. यामुळे तिचा मृत्यू विहिरीत पडून झाला,विजेचा धक्का बसून झाला अथवा बिबट्याच्या हल्ल्यात  झाला याची ठोस माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढे येईल.तसेच तपासानंतर शुभांगी भालेराव हिच्या मृत्यूचे मूळ कारण समोर येणार आहे.

याबाबत माहिती देताना वनपाल नारायण आरूडे म्हणाले, ही तरुणी विहिरीत पडली होती.तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात पोलिस तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल व पोलिसांचा तपासातील निष्कर्ष पुढे आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Web Title: Shocking! A 19 year old girl went to start an electric pump in a field; Found dead in the well in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.