धक्कादायक! रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य, ग्रामस्थांमध्ये घबराट; बोकडाचे मुंडके आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:19 IST2023-07-18T15:17:41+5:302023-07-18T15:19:21+5:30
समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन अघोरी कृत्य करून अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत

धक्कादायक! रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य, ग्रामस्थांमध्ये घबराट; बोकडाचे मुंडके आणि...
राजगुरुनगर: रेटवडी (ता खेड )येथील वैकुंठ स्मशानभूमीत धक्कादायक अघोरी कृत्य करण्यात आले आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे कृत्य करणाऱ्या पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अघोरी कृत्य करून समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत. रेटवडी (ता खेड ) येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. सोमवारी ( दि १७ )रोजी अमावस्या असल्यामुळे गावच्या स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके, पाय काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. आज सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याचा शोध असा प्रकार करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी. अशी मागणी रेटवडीचे माजी सरपंच दिलीप पवळे व ग्रामस्थांनी केली आहे.