धक्कादायक! पुण्यातल्या नायडू रुग्णालयामधून घरी पाठविलेले दाम्पत्य निघाले पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 12:11 AM2020-04-11T00:11:41+5:302020-04-11T00:13:35+5:30
हे दोघे कोरोना रुग्णाच्या निकटच्या सहवासातील असल्याने संशयित असूनही घरी का सोडण्यात आले असा प्रश्न उपस्थित
पुणे : ससून रुग्णालयामध्ये गुरुवारी कोंढव्यातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यांनतर या महिलेच्या मुलासव गरोदर सुनेला डॉ. नायडू रुग्णालयात बोलावण्यात आले. त्यांचे नमुने घेऊन त्यांना दिवसभर बसवून ठेवत संध्याकाळी घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्या या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोघे कोरोना रुग्णाच्या निकटच्या सहवासातील असल्याने संशयित असूनही घरी का सोडण्यात आले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोंढव्यातील एका वृद्ध महिलेला कोरोनाची लक्षणे आढळल्याने उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यानंतर सर्वेक्षण पथकाकडील डोकटर्स व कर्मचा?यांनी त्यांच्या मुलासह सुनेला रुग्णवाहिकेमधून डॉ. नायडू रुग्णालयात पाठविले. सून गरोदर असल्याने त्यांना फार काळ बसणे अवघड झाले होते. त्यांना त्रास होत होता. परंतु, त्यांना दिवसभर बसवून ठेवण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. या दोघांना घरी सोडण्यात आले. मुळात हे दोघे कोरोनाच्या रुग्णाच्या निकटच्या संपर्कात होते. तसेच ते दोघे संशयित असतानाही त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात अनेकजण येतील त्यातून अनेकांना संसर्ग होऊ शकतो याचा विचार का करण्यात आला नाही असा प्रश्न केला जात आहे. या दोघांचेही वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडणा?्या डॉक्टरांविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.