धक्कादायक ! त्वचेच्या कॅन्सरला कंटाळून उचलले टाेकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 01:08 PM2020-02-20T13:08:36+5:302020-02-20T13:09:43+5:30
त्वचेच्या कॅन्सरला कंटाळून आत्महत्या करण्यास गेलेल्या नागरिकाचे पाेलिसांनी प्राण वाचविले.
पुणे : त्वचेच्या कॅन्सरला कंटाळून एका नागरिकाने टाेकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी भागात घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या तसेच पाेलिसांच्या प्रसंगावधनामुळे त्या नागरिकाचे प्राण वाचू शकले.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9.30 च्या सुमारास विश्रांतवाडी येथील खाणीमध्ये एक 52 वर्षाची व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी उतरल्याचे स्थानिकांनी पाेलिसांना कळवले. तातडीने आळंदी राेड पाेलीस चाैकीचे पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या व्यक्तीची समजूत काढली. तसेच त्याला स्थानिकांच्या मदतीने खाणीतून बाहेर काढले. त्वचेच्या कॅन्सरला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्या व्यक्तीने पाेलिसांना चाैकशीत सांगितले. अनेक वर्षांपासून कॅन्सरने पिडीत असल्याने त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले हाेते. त्यामुळे त्याने टाेकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. येथील जवळील ग्रेफ सेंटरमध्ये ती व्यक्ती कामास आहे.
याप्रकरणी पाेलिसांनी त्या व्यक्तीची समजूत काढत त्याच्या कुटुंबियांना बाेलावून घेत त्यांच्या ताब्यात त्या व्यक्तीला दिले. स्थानिकांच्या तसेच पाेलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्या नागरिकाचे प्राण वाचू शकले. दरम्यान विश्रांतवाडी येथे माेठी खाण असून अनेकांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आहेत. स्थानिकांकडून ही खाण बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे.