धक्कादायक! परिस्थितीला कंटाळून पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 09:36 AM2020-06-19T09:36:29+5:302020-06-19T09:37:57+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, सुखसागर नगर भागात सर्वे नंबर 15/1 येथे शशिकांत चिवे यांचे घरी भाड्याने हे कुटुंब राहत होते. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्यांनी बराच वेळ दार वाजवूनही प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना बोलावण्यात आले

Shocking! Fed up with the situation, a family commits suicide in Pune | धक्कादायक! परिस्थितीला कंटाळून पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

धक्कादायक! परिस्थितीला कंटाळून पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

googlenewsNext

पुणे - पुण्यात सुखसागरनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने गुरुवारी रात्री  उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33 वर्ष ), जया अतुल शिंदे (वय 30 वर्ष), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6 वर्ष), अंतरा अतुल शिंदे (वय 3 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्याने भिंतीवर

याबाबत अधिक माहिती अशी की, सुखसागर नगर भागात सर्वे नंबर 15/1 येथे शशिकांत चिवे यांचे घरी भाड्याने हे कुटुंब राहत होते. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्यांनी बराच वेळ दार वाजवूनही प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी दरवाजा तोडल्यावर हा प्रकार समोर आला. 
या दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी घराच्या भिंतीवर कारण लिहून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 'कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवित आहोत' असे घराच्या भिंतीवर लिहिलेले आढळले. त्याखाली पती पत्नीची सही आढळून आली आहे.यातील पतीचा डिजिटल आय कार्ड बनवण्याचा व्यवसाय असल्याचे समजते.

Read in English

Web Title: Shocking! Fed up with the situation, a family commits suicide in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.