धक्कादायक..! प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन, कोथरुडमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:22 PM2018-07-10T15:22:34+5:302018-07-10T15:26:38+5:30

प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरणाची माहिती दिल्याने चिडून तिघा जणांनी मित्राच्या गळ्यावर बियरची बाटली खूपसून त्याचा खुन केला़.

Shocking ..! friend murder due to told loveship information to girl friend home, incidents in Kothrud | धक्कादायक..! प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन, कोथरुडमधील घटना

धक्कादायक..! प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन, कोथरुडमधील घटना

googlenewsNext

पुणे : प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरणाची माहिती दिल्याने चिडून तिघा जणांनी मित्राच्या गळ्यावर बियरची बाटली खूपसून खुन केला़. ही घटना कोथरुडमधील कलाग्राम सोसायटीत पहाटे ४ वाजता घडली़.
अक्षय जोरी असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी सुशांत ओंबळे, प्रशांत ओंबाळे व सागर मेस्त्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुशांत ओंबाळे आणि अक्षय जोरी हे मित्र होते़. दोन वर्षापूर्वी सुशांत याच्या प्रेमप्रकरणाची माहिती अक्षयने प्रेयसीच्या घरी सांगितली . त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता़. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा त्याच कारणावरुन ते व त्याचे मित्र कलाग्राम सोसायटी येथे दारूची पार्टी करत असताना त्यांच्यात वाद झाला़. तेव्हा सुशांत ओंबाळे याला त्याचे घरी सोडले़. त्यानंतर तिघांनी मिळून संगनमत करुन ते पुन्हा पहाटे चार वाजता कलाग्राम सोसायटीत आले़. त्यावेळी सुशांत याने बियरची बाटली फोडली व अक्षयच्या गळ्याजवळ खुपसली़. त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला़. कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे अधिक तपास करीत आहेत़. 

Web Title: Shocking ..! friend murder due to told loveship information to girl friend home, incidents in Kothrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.