धक्कादायक! पतीनेच सांगितले माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:59 AM2020-02-11T11:59:03+5:302020-02-11T12:00:21+5:30

होस्टेलमध्ये राहत असताना तेथे काम करणाऱ्या एकाने महिलेवर जबरदस्तीने केली...

Shocking! Husband said rape on my wife | धक्कादायक! पतीनेच सांगितले माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव

धक्कादायक! पतीनेच सांगितले माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव

Next
ठळक मुद्देमहिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : होस्टेलमध्ये राहत असताना तेथे काम करणाऱ्या एकाने महिलेवर जबरदस्तीने केली. तिने हे आपल्या पतीला सांगितल्यावर पतीने दिलेल्या उत्तराने पत्नीला जबरदस्त धक्का बसला. पतीने तिला सांगितले़ मीच तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. 
पत्नीच्या तक्रारीनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरेश शैशराज शिंदे (वय ३४, रा. हिलटॉप सोसायटी, धनकवडी) याला अटक केली आहे. तर या महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील एका होस्टेलवर नोव्हेंबर २०१९ मध्ये घडली होती. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला आपल्या पतीसमवेत होस्टेलवर रहात होती. या होस्टेलमधील सुरेश शिंदे याने या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा त्याने आपणच सुरेश शिंदे याला तुज्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. त्याच्या उत्तराने पत्नीला धक्का बसला. शेवटी तिने नातेवाईकांशी बोलल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी सुरेश शिंदे व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन शिंदे याला अटक केली आहे.

Web Title: Shocking! Husband said rape on my wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.