दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना! प्रेम संबंधातून युवतीचा गळा चिरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 13:26 IST2022-07-05T13:25:30+5:302022-07-05T13:26:06+5:30
जखमी युवतीला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना! प्रेम संबंधातून युवतीचा गळा चिरला
कुरकुंभ : कुरकुंभ ता.दौंड येथे पुणे सोलापुर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात सतरा वर्ष मुलीचा गळा चिरून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोपी (राहुल श्रीशैल निरजे, वय 27) याला ताब्यात घेण्यात आले आहे. युवती गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे. जखमी युवतीला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना ही प्रेम संबंधातून झाली असल्याची प्राथमिक माहीती मिळाली असून आरोपीने लग्नासाठी प्रतीसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.