पुण्यातील धक्कादायक घटना, ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह फेकला जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 01:16 PM2018-03-24T13:16:29+5:302018-03-24T14:43:14+5:30

सतत ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून करुन तिचा मृतदेह जवळील जंगलात फेकून दिल्याची घटना पुण्यात घडली आहे

A shocking incident in Pune, a blackmailer killed in a forest murdered | पुण्यातील धक्कादायक घटना, ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह फेकला जंगलात

पुण्यातील धक्कादायक घटना, ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह फेकला जंगलात

Next

पुणे - ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करणा-या प्रेयसीचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजे पोलिसांनी यातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मयत तरुणी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. वारजे पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव विपुल शाह असे आहे. प्रेरणा कांबळे (वय-19, रा.शिवणे, पुणे), असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.

विपुल शाह आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, विपुल शाहचे विवाहबाह्य संबंध होते. त्याचे लग्न झाले असताना त्याच्या एका तरुणीशी संबंध होते. ती तरुणी त्याला सतत ब्लॅकमेल करत होती. सततच्या जाचाला कंटाळून विपुल शाहने रागाच्या भरात मित्राच्या मदतीने त्या तरुणीचा खून केला आणि मृतदेह जवळील जंगलात फेकला. 

मयत प्रेरणा आणि विपुल यांच्यात काही दिवसांपासून प्रेमसबंधं होते. परंतू प्रेरणा ही आरोपी विपुल याला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे पैशाची मागणी करत होती. या सर्व प्रकाराला कंटाळून आरोपी विपूल याने तिचा काटा काढण्याचे ठरवले आणि एका मित्रासोबत तिला फिरण्यासाठी म्हणून मुळशी परिसरात घेऊन गेला. त्यानंतर कारमध्ये गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह पौड पोलिसांच्या हद्तीतील वाघजाई डोंगर परिसरात तिचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास वारजे पोलीस करीत आहेत.  

Web Title: A shocking incident in Pune, a blackmailer killed in a forest murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.