पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला गळा दाबून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 12:32 PM2021-06-06T12:32:56+5:302021-06-06T14:18:22+5:30

अवघ्या १९ वर्षाच्या पत्नी व प्रियकराचे कृत्य

Shocking incident in Pune! Husband, who was an obstacle in love, was strangled to death with the help of his lover | पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला गळा दाबून केला खून

पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला गळा दाबून केला खून

Next
ठळक मुद्देपतीला दुधातून दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास केला हा प्रकार

पुणे: लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध सुरु ठेवण्यात अडथळा ठरणार्‍या पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन त्यानंतर त्याचा गळा दाबून खून करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १९ वर्षाची पत्नी व तिच्या प्रियकराने हे कृत्य केले आहे.

याप्रकरणी लोणी काळभोरपोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अश्विनी मनोहर हांडे (वय १९, रा. उरळी देवाची), गौरव संतोष सुतार (वय १९, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मनोहर हांडे (वय २७, रा़ उरुळी देवाची) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकेतन बाबासाहेब निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. उरुळी कांचन येथे मनोहर हांडे यांचा २४ मेला मृत्यु झाला होता. 

लोणी काळभोरपोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद करुन त्याचा तपास सुरु केला. तपासादरम्यान अश्विनी व गौरव यांचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असून त्यातूनच घातपात झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर त्याने अश्विनीच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. मनोहर हांडे याचे अश्विनीशी जानेवारीमध्ये लग्न झाले होते. गौरव व अश्विनी यांचे प्रेमसंबंध होते. त्यात मनोहर याचा अडथळा ठरत येत होता. गौरव याने अश्विनी हिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. तिने मनोहर याला दुधातून या गोळ्या दिल्या. त्यामुळे मनोहर गाढ झोपी गेल्यावर मध्यरात्री २ वाजता त्यांनी गळा दाबून त्याचा खुन केला. त्यानंतर गोळ्यांचे पाकिट फेकून दिले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक सुभाष काळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking incident in Pune! Husband, who was an obstacle in love, was strangled to death with the help of his lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.