धक्कादायक..! अजूनही शाबूत आहे परदेशातील बँकांमध्येच भारतीयांचा ' काळा पैसा '

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:46 AM2019-03-12T11:46:49+5:302019-03-12T11:47:06+5:30

गेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी तेव्हा विरोधात असलेले रामदेव बाबा यांनी परदेशात भारतीयांनी लाखो कोटी रुपयांचा बेनामी पैसा ठेवला असल्याचे आरोप केले होते. हा

Shocking ..! Indians' black money is still in foreign banks | धक्कादायक..! अजूनही शाबूत आहे परदेशातील बँकांमध्येच भारतीयांचा ' काळा पैसा '

धक्कादायक..! अजूनही शाबूत आहे परदेशातील बँकांमध्येच भारतीयांचा ' काळा पैसा '

googlenewsNext
ठळक मुद्देमाहिती अधिकारात उघड : खात्यांची तपासणी देखील पाच वर्षांत पूर्ण नाही 

 पुणे : परदेशतील काही भारतीयांच्या बेनामी संपत्तीवरुन गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रान उठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्ता आल्यानंतर मात्र,  संशयित बेनामी संपत्ती गोळा करणाऱ्या खात्यांचा साधा तपासही पूर्ण करता आलेला नाही. संशयित ६२८ खात्यांपैकी साडेआठ हजार कोटी रुपये असलेल्या ४१७ प्रकरणांचा तपास गेल्या पाच वर्षांत झाला आहे. 
माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सकडे त्याबाबतची माहिती मागितली होती. फ्रान्स सरकारने २०१२ साली स्विस बँकेत खाते असलेल्या ६२८ भारतीयांची जी यादी सरकारकडे दिली होती, त्याचाच उल्लेख करण्यात आला आहे. या खात्यातील ४१७ केसेसची तपासणी झाली असून, त्यातून ८ हजार ४६५ कोटी रुपयांचे काळे धन शोधले असल्याचे सांगण्यात आले. या शिवाय इंटरनॅशनल कन्सोरशियम ऑफ इनव्हेस्टीगेटीव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) या संस्थेने सातशे भारतीयांची परदेशातील जी माहिती समोर आणली, त्यानुसार भारतीयांचे परदेशी बँकांमधील खात्यात ११ हजार १० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. भारतात आणि भारताबाहेर नक्की किती बेनामी संपत्ती आहे, याचा निश्चित आकडा नसल्याचे उत्तर डायरेक्ट टॅक्सेसने दिले आहे. 
याबाबत बोलताना वेलणकर म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी तेव्हा विरोधात असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि रामदेव बाबा यांनी परदेशात भारतीयांनी लाखो कोटी रुपयांचा बेनामी पैसा ठेवला असल्याचे आरोप केले होते. हा पैसा भारतात आल्यास विकासकामांना गती मिळेल, तसेच कराचे ओझे देखील कमी होईल, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यादृष्टीने काहीच झाले नाही. उलट पुर्वीच्या सरकारच्या काळात फ्रान्स सरकारने दिलेल्या यादी नुसार खात्यांचा तपासही पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यातील रक्कमेचा आकडा देखील अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय तपासणी पूर्ण झालेल्या दोषी खातेदारांची नावे देखील अजून, जाहीर केलेली नाहीत.  

Web Title: Shocking ..! Indians' black money is still in foreign banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.