धक्कादायक माहिती! DRDO चा संचालक पाकच्या गुप्तहेरांनाही भेटल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 08:53 AM2023-05-06T08:53:15+5:302023-05-06T08:54:24+5:30
दिल्ली मुख्यालय येथील ॲडीशनल डायरेक्टर व्हिजिलन्स ॲण्ड सिक्युरिटी डिआरडीओचे कर्नल यांनी मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे - संवेदनशील शासकीय गुपिते व अन्य माहिती पाकिस्तानला पुरवल्या प्रकरणी पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी डीआरडीओचा संचालकाला अटक केली. प्रदीप मोरेश्वर कुरूलकर (५९) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली. चौकशीत कुरूलकरने विदेशवारी केल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान तो पाकिस्तान इंटेलिजन्सचा ऑपरेटिव्ह (पीआयओ) हस्तकाला भेटल्याचा संशय व्यक्त केला आहे.
दिल्ली मुख्यालय येथील ॲडीशनल डायरेक्टर व्हिजिलन्स ॲण्ड सिक्युरिटी डिआरडीओचे कर्नल यांनी मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ डिसेंबर २०२२ च्या पूर्वी ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडल्याचा संशय आहे. प्रदीप कुरूलकर हा डीआरडीओच्या दिघी येथील रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट एस्टॉब्लिस्ट (इंजिनिअर्स) आणि डीआरडीओच्या पाषाण येथील ऑफिस ऑफ अर्नामेंट ॲन्ड कॉम्बेक्ट इंजिनिअरिंग (एसीई) येथे कार्यरत असताना हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.