धक्कादायक! रुग्णालयात उपचार सुरू असताना ऑक्सिजन संपला; तीन जणांनी आपला जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 08:43 PM2021-04-20T20:43:26+5:302021-04-20T20:43:51+5:30

हडपसर जवळील शेवाळेवाडीतील दुर्दैवी घटना.....

Shocking! Oxygen depleted while undergoing treatment at the hospital; Three people lost their lives | धक्कादायक! रुग्णालयात उपचार सुरू असताना ऑक्सिजन संपला; तीन जणांनी आपला जीव गमावला

धक्कादायक! रुग्णालयात उपचार सुरू असताना ऑक्सिजन संपला; तीन जणांनी आपला जीव गमावला

Next

हडपसर : शेवाळेवाडी येथील योग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच ऑक्सिजन संपल्याने तिघांचा तडफडून मृत्यू झाला आहे. तर एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.

शेवाळेवाडी येथील योग हॉस्पिटलमध्ये 53 बेड असून, 40 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन सिलिंडरचा साठा संपत आला असून, हॉस्पिटलबरोबर रुग्ण आणि नातेवाईकांसमोर मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. प्राणवायूअभावी प्राण गमवावे लागत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ऑक्सिजन मिळविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी  संपर्क सुरू आहे. त्यानंतर सात सिलिंडर मिळाले, मात्र रुग्ण संख्या जास्त असल्याने उपचार करण्यात अनेक अडथळे येत आहेत. ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

डॉ. अभिजित दरक म्हणाले,  हॉस्पिटलमध्ये 23 ऑक्सिजन व १२ व्हेंटिलेटर बेड असून कोरोनाबाधितांवर उपचार आहेत. हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांना एका तासाला सात ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे. आता फक्त एक-दीड तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याची पहिली झळ हडपसरमधील योग हॉस्पिटलला बसली आहे. हॉस्पिटलमध्ये एकही रुग्ण उपचारासाठी घेऊ शकत नाही. ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, म्हणून सात बेड कमी केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. 

ऑक्सिजनची कमतरता मोठी आहे. काल सायंकळी सातपासून ग्रुप आणि वेबसाईटवर मागणी टाकली आहे. मात्र, देशभरातच ऑक्सिजनचा तुटवडा आहे. लिक्विड ऑक्सिजन नाही, त्यामुळे लिक्विडचा तुटवडा आहे. परिस्थिती भयावह आहे. ऑक्सिजन मिळविण्यात आम्ही हतबल झालो आहेत. ऑक्सिजन नाही, प्रशासनाने तो तातडीने उपलब्ध करून देऊन नागरिकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी प्राणवायूअभावी प्राण गमवावे लागत आहे, असा टाहो फोडला. केंद्र आणि राज्य सरकारने रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करून नागरिकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Shocking! Oxygen depleted while undergoing treatment at the hospital; Three people lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.