धक्कादायक! रुग्णालयाच्या दारातच झाला मृत्यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:26 AM2021-04-21T11:26:27+5:302021-04-21T13:16:51+5:30

कोंढव्यातील हॉस्पिटलमध्ये शिरुन केली तोडफोड

Shocking! The patient died while being taken for treatment, angry relatives beat the doctor | धक्कादायक! रुग्णालयाच्या दारातच झाला मृत्यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

धक्कादायक! रुग्णालयाच्या दारातच झाला मृत्यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

Next
ठळक मुद्देकोंढव्यातील प्राईम हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली

पुणे: कार्डियाक रुग्णवाहिकेतच हॉस्पिटलच्या दारात रुग्णाचा मृत्यु झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करुन  हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. ही घटना कोंढव्यातील प्राईम हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ़ सिद्धांत तोतला (वय २५, रा. मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. 

कोंढवा येथील प्राईम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबारा वाजता व्हिजिटला आले होते.  त्यावेळी एका कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती़ डॉ़ तोतला यांनी त्याला तपासले़ तेव्हा रुग्णाची नाडी लागत नव्हती. त्याचा मृत्यु झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळविले. डॉ. ताबीश व डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले. त्यांनी तेथे जमलेल्या १५ ते २० जणांना रुग्णाचा मृत्यु झाल्याचे सांगितले. हे समजल्यावर त्यांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपाने मारहाण केली. तसेच हॉस्पिटलमधील अकाऊंटंट इमाम हुल्लर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. सुरक्षा रक्षकाच्या केबीनची काच फोडून नुकसान केले. हॉस्पिटलसमोरील दरवाजावर दगड फेकले. दरवाजासमोरील कुंडीमधील झाडे फेकून देऊन नुकसान केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त देशमुख, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक ऐ. के. चाऊस यांनी प्राईम हॉस्पिटलला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

Web Title: Shocking! The patient died while being taken for treatment, angry relatives beat the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.