धक्कादायक! सतरा वर्षीय मुलीच्या इच्छेविरुद्ध तरुणाने केला लैंगिक अत्याचार,गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 13:11 IST2021-03-15T13:10:08+5:302021-03-15T13:11:03+5:30
पिंपरी पोलिसांकडून तरुणाला अटक

धक्कादायक! सतरा वर्षीय मुलीच्या इच्छेविरुद्ध तरुणाने केला लैंगिक अत्याचार,गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस
ठळक मुद्देमुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार
पिंपरी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. ऑगस्ट २०२० ते १० फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला.
अशोक कमलेश राज्यभर (वय १९, रा. ठाणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी याने मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. तिने पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे पुढील तपास करीत आहेत.