धक्कादायक..! गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसच्या चाकातून धूर, मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 11:43 IST2025-03-02T11:43:58+5:302025-03-02T11:43:58+5:30
गाडीच्या एम.२ डब्याच्या चाकातून धूर आणि आगीच्या ठिणग्या निघताना दिसताच रेल्वे थांबवण्यात आली

धक्कादायक..! गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसच्या चाकातून धूर, मोठा अनर्थ टळला
पुणे - नीरा रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गोवा-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसचा संभाव्य मोठा अपघात टळला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास या गाडीच्या एम.२ डब्याच्या चाकातून धूर आणि आगीच्या ठिणग्या निघताना दिसताच रेल्वे थांबवण्यात आली.
सुरक्षा तपासणीनंतर गाडी तब्बल चार तास उभी राहिली, त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस, दर्शन एक्सप्रेस आणि पुणे-सातारा डेमो या गाड्या खोळंबल्या. हजारो प्रवासी वाट पाहत संतप्त झाले, तर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे सुरू केली. ही घटना रेल्वे सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे.