धक्कादायक! पेट्रोलपंपावरील टँकमधून चक्क 'सायपन' पद्धत वापरून लाखाच्या डिझेलची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 21:31 IST2020-12-15T21:30:56+5:302020-12-15T21:31:25+5:30
इंदापूर तालुक्यातील या घटनेत चोरट्यांनी लाखो रुपयांचे १२९० लिटर डिझेल काढुन नेले.

धक्कादायक! पेट्रोलपंपावरील टँकमधून चक्क 'सायपन' पद्धत वापरून लाखाच्या डिझेलची चोरी
कळस : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील बारामती रस्त्यावरील कुणाल ऑटोलाइन्स या पेट्रोलपंपावरील टँकमधून चक्क सायपन पद्धतीने डिझेलचोरी करण्यात आली आहे.सायपन पध्दतीने थेट पंपाच्या टँकमधुन इंधन चोरी करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. परीसरात हिही चोरी चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेत चोरट्यांनी लाखो रुपयांचे १२९० लिटर डिझेल चोरट्यांनी काढुन नेले.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लासुर्णे हद्दीतील कुणाल ऑटोलाइन्स या पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा हा पेट्रोल पंप आहे. याप्रकरणी कर्मचारी नानासो पवार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. रविवारी दि. १३ रात्री ते सोमवार दि. १४ रोजी सकाळी ९ वाजण्यांच्या मौजे लासुर्णे गावचे हद्दीतील बारामती रोडलगत हाँटेल राजमुद्रा शेजारी ही घटना घडली आहे. डिझेलच्या टाकीमधुन अंदाजे १२९० लिटर डिझेल प्रती लिटर किंमत ७९.७९ रुपये असे एकुण १ लाख २९२९ रुपये किमतीचे आहे. चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील कुंपनामधून येऊन थेट टाकीमधून पाईप टाकून सायपन पद्धतीने हे इंधन चोरले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार चौधर करीत आहेत.
———————————