धक्कादायक ! परिस्थितीला कंटाळून अवघ्या २१ व्या वर्षी लोककलावंत आणि नृत्यांगनेची पुण्यात आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 02:07 PM2020-10-07T14:07:20+5:302020-10-07T21:13:10+5:30

राज्यात आत्तापर्यंत ६ कलाकारांनी आत्महत्त्या केली आहे. 

Shocking! Tired of the situation she committed suicide in Pune on 21age | धक्कादायक ! परिस्थितीला कंटाळून अवघ्या २१ व्या वर्षी लोककलावंत आणि नृत्यांगनेची पुण्यात आत्महत्या 

धक्कादायक ! परिस्थितीला कंटाळून अवघ्या २१ व्या वर्षी लोककलावंत आणि नृत्यांगनेची पुण्यात आत्महत्या 

Next
ठळक मुद्देप्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना प्रियंका काळे यांची बहीण आणि नृत्यांगना 

पुणे :  पुण्यात परिस्थितीला कंटाळून आत्महत्या प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना प्रियंका काळे यांची बहीण आणि नृत्यांगना विशाखा काळे यांनी अवघ्या २१ व्या वर्षी परिस्थितीला कंटाळून मंगळवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली. प्रसिद्ध निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची लोकधारा, अरुण गायकवाड यांच्या गर्जा महाराष्ट्र, आई जिजाऊंची मालिका, लावणी कार्यक्रम आदी कार्यक्रमात काम करत होत्या. राज्यात आत्तापर्यंत ६ कलाकारांनी आत्महत्त्या केली आहे. 

विशाखा काळे यांच्या घरी आई आणि वडील दोघेही अंध आहेत. त्यामुळे घरात त्या एकट्याच कमावत्या होत्या.  परंतू, कोरोना महामारीने गेले सहा महिने कुठलेच काम नसल्याने आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने काळे यांनी आपला जीवन प्रवास संपवला. वैकुंठ स्मशानभूमी येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. 

पाच सहा महिने काम नसल्याने कलाकार आता तुटून गेले आहेत. जगावं की मरावं हा प्रश्न त्यांना भेडसावतोय. शासनाने कलाकारांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा रोज अशा आत्महत्या व्हायला सुरुवात होईल,असे कलाकारांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे. 

Web Title: Shocking! Tired of the situation she committed suicide in Pune on 21age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.