मासे पकडण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 06:14 PM2020-11-06T18:14:57+5:302020-11-06T18:16:32+5:30

चार जण शेताच्या बाजूला असलेल्या महादेवाच्या तळ्यामध्ये मासेमारी करण्यासाठी सकाळी गेले होते..

Shocking! two peson drown who went to caught fishing in lake ; Incidents in Ambegaon taluka | मासे पकडण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना 

मासे पकडण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना 

googlenewsNext

मंचर: मासे पकडण्यासाठी तळ्यावर गेलेल्या मामा भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव येथे आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. संजय शिवराम केदारी (वय 32) व ऋषिकेश विजय काळे( वय 8 दोघे मूळ रा. पहाडदरा सध्या रा.लाखनगाव ता.आंबेगाव) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर दोघांना तळ्याच्या बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्याच्या पूर्व भागात लाखनगाव येथे महादेवाचे तळे आहे.आदिवासी ठाकर समाजातील शेतमजूर शेतात काम करण्यासाठी लाखनगाव गावात मागील चार वर्षापासून स्थायिक झाले आहेत. त्यातील चार जण शेताच्या बाजूला असलेल्या महादेवाच्या तळ्यामध्ये मासेमारी करण्यासाठी सकाळी गेले होते. यामध्ये मामा भाच्याचाही समावेश होता. मासे पकडण्यासाठी संजय केदारी व ऋषिकेश काळे हे पाण्यात उतरले. मासे पकडत असताना 10 ते 12 फूट खोल असलेल्या तळ्यामध्ये गाळात अडकून संजय शिवराम केदारी व ऋषिकेश विजय काळे हे पाण्यात बुडाले गेले. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या तळ्याच्या बाजूलाच शेतात काम करणारे विक्रम राजाराम धरम, बाळासाहेब फकिरा धरम यांना रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तळ्याकडे धाव घेतली. त्या ठिकाणी गेले असता दोन जण बुडाल्याची माहिती त्यांना मिळाली. दोघांनी तात्काळ तळ्यात उडी मारून तब्बल अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर बुडालेल्या दोघांना दुपारी साडेबाराच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढले.

ही घटना मंचर पोलिसांनी नवीनच राबवलेल्या सुरक्षा यंत्रणेत फोन करुन कळविण्यात आली. दोन जण पाण्यात बुडाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजली.सरपंच प्राजक्ता रोडे,पोलीस पाटील कल्पिता बोऱ्हाडे यांनी तात्काळ ही घटना आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी तसेच मंचर पोलीस ठाण्यात कळवली.तहसीलदार  मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पारगावचे बीट जमादार निलेश खैरे व विठ्ठल वाघ यांनी पंचनामा केला आहे. तहसीलदार रमा जोशी यांनी घटनास्थळाला भेट दिली.मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Shocking! two peson drown who went to caught fishing in lake ; Incidents in Ambegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.