बारामतीतील धक्कादायक प्रकार! जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत तब्बल १ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:25 PM2022-05-23T19:25:07+5:302022-05-23T19:25:38+5:30

लाकडी(ता. इंदापुर)येथील जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत ३ हेक्टर ४८ आर शेतजमिन नावावर करून देत १ कोटी १५ लाख रुपयांची दोघाजणांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Shocking type in Baramati Fraud of Rs 1 crore pretending to be the original owner of the land | बारामतीतील धक्कादायक प्रकार! जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत तब्बल १ कोटींची फसवणूक

बारामतीतील धक्कादायक प्रकार! जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत तब्बल १ कोटींची फसवणूक

googlenewsNext

बारामती: लाकडी(ता. इंदापुर)येथील जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत ३ हेक्टर ४८ आर शेतजमिन नावावर करून देत १ कोटी १५ लाख रुपयांची दोघाजणांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रक़रणी बारामती शहर पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी   किशोर हनुमंत खाडे (रा. रुई, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार मोबाईल क्रमांक ९६३७६७१७३६ वापरणारा व स्वत:चे नाव नरेश दुसेजा सांगणाºया तसेच मोबाईल क्रमांक ९७६७८८२७६६ वापरणारा व स्वत:चे नाव प्रशांत जगताप (रा. पुणे) सांगणाऱ्या दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी खाडे व त्यांच्या कुटुंबाला शेतजमिन घ्यायची होती. जमीन एजंट शहाजी नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर) यांची फियार्दीशी भेट झाली. नरुटे यांनी लाकडी येथील जमिन गट क्रमांक ९३ मधील ३ हेक्टर ४८ आर जमिन विकायची असल्याचे सांगितले. तसेच दुसेजा (बनावट व्यक्ती) यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. फिर्यादी खाडे यांनी जमिन पाहून व्यवहार ठरवला. या व्यवहारावेळी नरेश गोपीचंद दुसेजा व प्रसांत जगताप नाव धारण करणाऱ्या व्यक्ति कारमधुन (एमएच-१२, केएल-८५२१) मधून आल्या होत्या. दुसेजा याने ही जमीन स्वत:ची असल्याचे सांगितले. १ कोटी १५ लाखांना हा व्यवहार ठरल्यानंतर इसारापोटी रक्कम देखील देण्यात आली. यावेळी दुसेजा नावाच्या व्यक्तिने माझा मूळ दस्त हरवला आहे, तो दुय्यम निबंधक कार्यालयातून काढून घेतो असे सांगत इसार पावती केली. त्यापोटी दिलेला १२ लाखांचा चेक नरेश दुसेजा नावाच्या व्यक्तिच्या नावे बारामतीच्या अ‍ॅक्सिस बँकेतून वटला. ३० एप्रिल रोजी फिर्यादीला  दुसेजा नावाच्या व्यक्तिने या जमिनीचा व्यवहार यापूर्वीच संजय वामन ढोले (रा. लाकडी) यांना करून दिल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी तात्काळ त्या व्यक्तिला संपर्क साधला. त्यांनी ढोले यांच्यासह त्यांची भेट घेतली. तुम्हा दोघांपैकी जो कोणी अगोदर खरेदीखत करून घेईल त्याला मी जमिन देणार असल्याचे त्याने  सांगितले. फिर्यादी व ढोले हे नातेवाईक असल्याने त्यांनी ढोले यांची इसारपावती रद्द करण्याचा व त्यांची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला.

बनावट व्यक्तींनी जमिनीची मालकी नसतानाही बनावट कागदपत्रे तयार  केली 

या जमिनीचे शासकिय मूल्य २४ लाख आहे. मात्र, ठरलेल्या १ कोटी १५ लाख रकमेचा दस्त करण्याचे फिर्यादीचे नियोजन होते. परंतु दुसेजा व जगताप नाव धारण केलेल्या व्यक्तिंनी आम्हाला टॅक्सची अडचण येईल, शासकिय किमतीचाच दस्त करा व उरलेली रक्कम रोख द्या असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने  नियोजन करीत स्वत:च्या, भावाच्या व मामांच्या नावचे चेक त्यांना दिले. त्यानंतर बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात १० मे रोजी दस्त करण्यात आला. उरलेली ८८ लाख ६५ हजारांची रक्कम त्यांना रोख देण्यात आली. दि. २० मे रोजी बारामतीतील अ‍ॅड. भापकर यांनी फिर्यादिला फोन करत तुम्हाला बनावट व्यक्तिने दस्त करून दिल्याचे सांगितले. मूळ मालक नरेश दुसेजा यांची त्यांनी भेट घालून दिली. यावेळी मूळ मालक दुसेजा यांनी फिर्यादीला शेलार यांच्याकडून जमिन घेतल्याची कागदपत्रे तसेच स्वत:चे आधार, पॅनकार्ड दाखवले. फिर्यादीने दस्तावेळी दुसेजा नावाच्या व्यक्तिने दिलेले पॅन, आधार कार्ड पाहिले असता ते बनावट असल्याचे लक्षात आले. बनावट व्यक्तींनी जमिनीची मालकी नसतानाही बनावट कागदपत्रे तयार करत आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.  

Web Title: Shocking type in Baramati Fraud of Rs 1 crore pretending to be the original owner of the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.