पुण्यातील धक्कादायक प्रकार! पोटच्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाखांना विकले, आईसह आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:58 PM2022-02-07T16:58:10+5:302022-02-07T16:58:25+5:30

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत हा प्रकार उघडकीस आणत मुलाची सुटका केली आहे

Shocking type in Pune 4 year old son sold for Rs 1 lakh accused arrested along with mother | पुण्यातील धक्कादायक प्रकार! पोटच्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाखांना विकले, आईसह आरोपींना अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार! पोटच्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाखांना विकले, आईसह आरोपींना अटक

Next

पुणे : पोटच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करून त्याची पनवलेमधील एका जोडप्यास एक लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत हा प्रकार उघडकीस आणत मुलाची सुटका केली आहे. तसेच यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. मध्यस्थाने या मुलाला आणखी दुसऱ्या कुटुंबाला १ लाख ६० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

मुलाची विक्री केल्याचा कोणाला संशय येवू नये म्हणून त्यांच्या आईने मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार शुक्रवारी (ता. ४) कोथरूडपोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा प्रकार उघडकीस आला. मुलाच्या आईने जन्नत बशीर शेख आणि रेश्‍मा सुतार यांच्या मदतीने मुलाची विक्री केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, कोथरूड, वारजे आणि उत्तमनगर पोलिस ठाण्यामधील ९ तपास पथकामार्फत मुलाचा शोध घेण्यात येत होता. पळवून नेलेला मुलगा घटनेच्या दिवशी दुपारी त्याच परिसरात राहणाऱ्या बांगडीवाली भाभीसोबत होता, अशी माहिती पोलिसांना तपासा दरम्यान मिळाली. त्यानुसार बांगडीवाली भाभी जन्नत शेख (रा. जळकेवस्ती, कोथरूड) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास करण्यात आला. मात्र तिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी कोथरूड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक आकाश वाल्मीकी आणि विशाल चौगुले यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला एका मुलास घेऊन जात असल्याने त्यांना दिसून आले. त्यामुळे जन्नत हिच्याकडे पुन्हा कसून सखोल तपास केला असता तिने गुन्हा केल्याचे कबूल केले. जन्नत हिने रेश्मा आणि प्रियांका यांच्याशी संगनमत व कट करून मुलाला मध्यस्थ असलेल्या तुकाराम निंबळे (रा. मावळ) याच्यामार्फत चंद्रकला माळी आणि भानुदास माळी (रा. बोर्लेगाव, पनवेल) यांना १ लाख रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले.

परिमंडळ तीनच्या पोलिस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके, सुनील जैतापूरकर, कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे, सहायक पोलिस निरीक्षक वृषाली पाटील, आरती खेतमाळीस, पोलिस उपनिरीक्षक काजोल यादव, किसन राठोड,  रतिकांत कोळी, विक्रम पवार, नागराज बिराजदार, चैतन्य काटकर यांच्यासह कोथरूड, उत्तमनगर आणि वारजे पोलिस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई केली.

मध्यस्थीने मुलाला १ लाख ६० हजारांना विकले

पनवेलमधील जोडप्याला मुलाची विक्री झाल्याने कोथरूड पोलिसांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्याशी संपर्क करून त्यांना चंद्रभागा माळी व भानुदास माळी यांना ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांनी मुलास १ लाख ६० हजार रुपयांना दीपक तुकाराम म्हात्रे व सीताबाई दीपक म्हात्रे (रा. केळवणे, पनवेल) यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी केळवणे येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले व आरोपींना अटक केली.

Web Title: Shocking type in Pune 4 year old son sold for Rs 1 lakh accused arrested along with mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.